लग्न नाही तर 'या' कारणामुळे दीपिकाकडे कोणताही नवीन सिनेमा नाही

संजय लीला भंसाळी यांच्या पद्मावत या सिनेमात दीपिकाने सगळ्यांचंच मन जिंकलं होतं. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर सगळे रेकॉर्ड तोडले. त्यात दीपिकाचा अभिनयही भन्नाट होता. पण ...

Renuka Dhaybar
21 मे : संजय लीला भंसाळी यांच्या पद्मावत या सिनेमात दीपिकाने सगळ्यांचंच मन जिंकलं होतं. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर सगळे रेकॉर्ड तोडले. त्यात दीपिकाचा अभिनयही भन्नाट होता. पण मीडिया रिपोर्टनुसार सध्या दीपिका कोणत्याच सिनेमात काम करत नाही आहे.पद्मावतनंतर दीपिकाने इरफान खानसोबत सपना दीदी हा सिनेमा साईन केला होता. पण इरफान आजारी असल्याने या सिनेमाची शुटिंग थांबवण्यात आली आहे. पण मग असं असताना दीपिकाला सिनेमाच्या ऑफर आल्या नाहीत असं होऊच शकत नाही. पण दीपिकानेच नवीन सिनेमा साईन करण्यास नकार दिला, असं सांगण्यात येत आहे.असं बोललं जातंय की, खांदा आणि मानेच्या दुखण्यामुळे दीपिका नवीन सिनेमा साईन करत नाही आहे. अंग दुखीच्या या आजारामुळे तिने अनेक नवीन सिनेमे करण्यास नकार दिला. कारण अर्थात लग्नासाठी आपल्या करिअरमध्ये अंतर देणाऱ्यातली दीपिका तरी नाही.

Trending Now