रणबीरनं करणला विचारलं,माझ्या गर्लफ्रेंडला काय सल्ला देशील?, मिळालं हे उत्तर

करणचा रेडिओ शो काॅलिंग सध्या चर्चेत आहे. या शोद्वारे तो सगळ्यांशी संवाद साधतोय. आणि असाच एक खाजगी सल्ला करणनं रणबीर कपूरला दिलाय.

मुंबई, 30 आॅगस्ट : करण जोहर अख्ख्या बाॅलिवूडचा मित्र आहे. अनेक जण त्याचा सल्ला घेतात. स्वत: अविवाहित असलेला करण जोहर सगळ्यांना सुखी रिलेशनशिपचे, सुखी लग्नाचे सल्ले देतोय. करणचा रेडिओ शो काॅलिंग सध्या चर्चेत आहे. या शोद्वारे तो सगळ्यांशी संवाद साधतोय. आणि असाच एक खाजगी सल्ला करणनं रणबीर कपूरला दिलाय.रणबीरनं या शोमध्ये करणला विचारलं, 'जर तुम्ही तुमच्या पहिल्या रिलेशनशिपमध्ये एक चूक करता आणि तीच चूक पुन्हा तुम्ही दुसऱ्या रिलेशनशिपमध्ये देखील करता तर ती सुधारण्यासाठी तुम्हाला काय केले पाहिजे ?'यावर करणनं ताबडतोब उत्तर दिलं, 'तुम्ही त्या नात्यातून लगेच बाहेर पडायला पाहिजे. तुम्ही एकच चूक नेहमी करत असाल, तर तुमच्यात काही कमतरता आहे. तेव्हा वेळीच सावध व्हायला हवं.'

म्हणजे हे नक्की की रणबीरला गर्लफ्रेंड आहे आणि आलियाशिवाय ती दुसरी कोणी असणं शक्य नाहीय. त्यामुळे करणनं आधीच हा सल्ला देऊन टाकलाय तर!आता पहिल्यांदाच एका मॅगेझीनसाठी रणबीर-आलियानं फोटोशूट केलंय. हे दोघेही अयान मुखर्जीच्या ब्रम्हास्त्र सिनेमात एकत्र काम करत असले तरीही एकत्र फोटोशूट करण्याची ही त्यांची पहिलीच वेळ आहे. त्यामुळे त्यांचा हा लूक पाहण्यासाठी त्यांचे फॅन्स आतुर असणार हे काही वेगळं सांगायला नको.मध्यंतरी प्रेमाविषयी विचारलेल्या एका प्रश्नाचं उत्तर देताना रणबीर म्हणाला की, जेव्हा व्यक्ती प्रेमात असतो तेव्हा तो काही अद्भूत काम करतो. प्रेमात असणं ही स्वत:मधेच एक सुंदर गोष्ट आहे.VIDEO : चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये दोन तरुणींचा दारू पिऊन धिंगाणा

Trending Now