#News18RisingIndia : शाॅट आणि सीनमधला फरकच मला माहीत नव्हता - कंगना राणावत

यावेळी तिनं तिचं स्ट्रगल, करियर, काँट्रोव्हर्सी या सगळ्यावर दिलखुलासपणे भाष्य केलं.

Sonali Deshpande
20 मार्च : कंगना राणावत म्हटलं की एकच शब्द समोर येतो तो म्हणजे बिनधास्त व्यक्तिमत्त्व. जे काही असेल ते परखडपणे बोलणं हा कंगनाचा स्वभावच. न्यूज18 रायझिंग इंडियात ती पोचली तेव्हा तिचा हाच अंदाज समोर आला. यावेळी तिनं तिचं स्ट्रगल, करियर, काँट्रोव्हर्सी या सगळ्यावर दिलखुलासपणे भाष्य केलं.सुरुवातीलच कंगनानं एक गमतीशीर अनुभव शेअर केला. ती म्हणाली, ' सुरुवातीला तुम्हाला बऱ्याच गोष्टींबद्दल माहिती नसते. मला सीन आणि शाॅट यातला फरकच ठाऊक नव्हता. सुरुवातीला मला सांगायचे, तुझे दोन सीन आहेत.. मला वाटायचं दोन शाॅट आहेत आणि जे अर्ध्या तासात संपून जातील.'कंगना म्हणाली, ' मला छोट्या छोट्या गोष्टींसाठी स्ट्रगल करावा लागला. आणि तेव्हा कुठे माझी जागा बनवू शकले. ' इंडस्ट्रीच्या बाहेरून आलेल्या कलाकाराला कशी वागणूक मिळते, या प्रश्नावर कंगना म्हणाली, तुमच्या वाट्याचा संघर्ष करावा लागतोच. तुम्हाला काम द्यायला इथे कुणी बांधील नसतं. तुम्हीही कोणाबरोबर काम करायला बांधील नसता.

कंगनाला विचारलं की तू सेन्साॅर बोर्डाची प्रमुख झाली तर कसे सिनेमे बनवशील? यावर ती हसून म्हणाली या पोस्टसाठी प्रसून जोशीच योग्य व्यक्ती आहे. 'मी प्रसून जोशी नाही होऊ शकत,' कंगना म्हणाली.

Trending Now