'तुझ्यासोबत फोटो नाही काढायचा',कतरीनासोबत चाहत्यांची हुलडबाजी

सध्या कतरीना कॅनाडाला गेली होती. परफाॅर्मन्स करून परत हाॅटेलकडे जात असताना चाहत्यांनी हुलडबाजी केली.

News18 Lokmat
कॅनाडा, 12 जुलै : 'द बँग' टूरसाठी कतरीना कैफ सध्या परदेश दौऱ्यावर आहे. कॅनाडामधील वेंकूवर शहरात फोटो काढण्यासाठी तिच्या चाहत्यांनी हुलडबाजी करत आम्हाला तुझ्यासोबत फोटो काढायचा नाही अशी नारेबाजी केली. त्यामुळे कतरीना नाराज झाली होती.कतरीना घाईघाईत आपल्या कारकडे जात होती. तेव्हा तिथे उपस्थितीत तिच्या चाहत्यांनी हुलडबाजी सुरू केली. यात तरुणींचाही समावेश होता. आम्हाला तुझ्यासोबत फोटो काढायचा नाहीये अशी नारेबाजीच या तरुणींनी सुरू केली. त्यामुळे कतरीना थांबली आणि मागे आली आणि नीट वागण्याचा सल्ला दिला.एकीकडे हा गोंधळ सुरू होता पण दुसरीकडे काही लोकांनी कतरीनासोबत फोटो काढण्यासाठी गर्दी केली. कतरीनानेही थांबून त्यांच्यासोबत फोटो काढले. त्यानंतर तिथून ती निघून गेली. 'द बँग' टूरसाठी कतरीना जगभरात प्रवास करत आहे.  अनेक ठिकठिकाणी शो करत आहे. सध्या कतरीना कॅनाडाला गेली होती. परफाॅर्मन्स करून परत हाॅटेलकडे जात असताना चाहत्यांनी हुलडबाजी केली.

Trending Now