खिलाडी अक्षय कुमार पुन्हा एकदा 'या' मराठी सिनेमात !

2013ला '72 मैल एक प्रवास' या मराठी सिनेमाची निर्मीती अक्षय कुमारनेच केली होती. या सिनेमाला आता 5 वर्ष झाले आहेत.

Renuka Dhaybar
मुंबई, 13 जून : बॉलिवूड स्टार आणि सबका खिलाडी अक्षय कुमार पुन्हा एका मराठी सिनेमात काम करणार असल्याची चर्चा आहे. मराठी दिग्दर्शीत होणाऱ्या 'चुंबक' या सिनेमात तो काम करणार असल्याचं बोललं जातयं.2013ला '72 मैल एक प्रवास' या मराठी सिनेमाची निर्मीती अक्षय कुमारनेच केली होती. या सिनेमाला आता 5 वर्ष झाले आहेत. म्हणजे अगदी 5 वर्षांनंतर अक्षय कुमार पुन्हा मराठी सिनेमांमध्ये झळकणार आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी एक पर्वणीच आहे असं म्हणायला हरकत नाही.'चुंबक' या मराठीत मुख्य भूमिका लेखक, गीतकार स्वानंद किरकिरे साकारणार असून त्यांच्यासोबत काही नवोदीत कलाकार असणार आहेत. सिनेमाच्या टीमने काही दिवसांपूर्वी हा सिनेमा अक्षय कुमारला दाखवला त्यानंतर हा सिनेमा त्याच्या डोक्यातून काही केल्या जाऊ शकला नाही. त्यामुळे अखेर त्याने हा सिनेमा प्रत्सुत करण्याचा निर्णय घेतला.

या सिनेमामुळे अक्षय कुमारचे नाव परत एकदा मराठी सिनेसृष्टीशी जोडले जाईल. आपल्या वेगवेगळ्या आणि दमदार भुमिकेने प्रेक्षकांची मन जिंकणारा खिलाडी अक्षय कुमार आता मराठी 'चुबंक' सिनेमातुन परत एकदा वेगळ्या विषयावरील सिनेमा घेउन येणार का ? हा प्रश्न आता त्याच्या चाहात्यानां पडला आहे.

Trending Now