सलमान खानचा 'भारत'मधला लूक पाहिला का?

सलमान खानच्या 'भारत'चं शूटिंग सुरू झालंय आणि सिनेमातला सलमानचा लूकही समोर आलाय. प्रियांका चोप्राही मेहबूब स्टुडिओत काही दिवसांपूर्वी दिसली होती.

मुंबई, 24 जुलै : सलमान खानच्या 'भारत'चं शूटिंग सुरू झालंय आणि सिनेमातला सलमानचा लूकही समोर आलाय. प्रियांका चोप्राही मेहबूब स्टुडिओत काही दिवसांपूर्वी दिसली होती. भारत सिनेमाचं दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केलंय. सलमान खान या सिनेमात 5 लूकमध्ये दिसणार आहे. वय वर्ष 25 ते वय वर्ष 65पर्यंतचा त्याचा प्रवास या सिनेमात आहे. सल्लूमियाँचा डिझायनर एशले रिबेल्लोनं सलमानचा हा लूक इन्स्टाग्रामवर टाकलाय. सलमानचा रेस 3 तुम्ही पाहिला असालच. मग 'भारत'मधला सलमानचा लूक या 'रेस 3'मधल्या लूकशी मिळताजुळता आहे.

सलमानचा 'भारत' हा कोरियन सिनेमा 'आॅड टू माय फादर' सिनेमाची काॅपी आहे. 1947 ते 2010पर्यंतचा काळ सिनेमात दाखवलाय. सिनेमात सलमानचा वेगवेगळा लूक प्राॅस्थेटिक मेकअपनं केला जाईल.सलमान 'धूम 4' सिनेमा करणार आहे. सलमान खान धूम 4 करणार हे ठरल्यावर सलमान खानसोबत कतरिनाच्या नावाची वर्णी लागणं हे काही फार धक्कादायक नाही. कारण कतरिना ही सलमानची खास मैत्रीण आहे आणि सलमान-कतरिनाची ऑन स्क्रिन जोडी प्रेक्षकांना पहायला आवडते.त्यामुळे यशराजनेही सलमान-कतरिना जोडीलाच प्राधान्य द्यायचं ठरवलेलं दिसतंय. सलमान-कॅटच्या चाहत्यांसाठी ही एक धमाल ट्रीट असू शकते.  पण रेस-3 वर झालेली टीका पाहता यावेळी तरी सलमानने सिनेमाची कथा पाहूनच सिनेमा स्वीकारावा, असा सल्ला सलमानला सोशल मीडियावर अनेकांनी दिलाय.प्रियांका चोप्रासोबत सलमाननं  सलाम-ए-इश्क, मुझसे शादी करोगी आणि गॉड तुस्सी ग्रेट हो असे सिनेमे केलेत. आता दोघं भारत करतायत. प्रियांकानं आधीच हाॅलिवूडमध्ये आपलं स्थान बळकट केलंय. सलमान आणि प्रियांकाची जोडी बऱ्याच दिवसांनी पाहायला मिळणार आहे.

Trending Now