दीदींनी नखरे केले नसते तर... आशा भोसले

आज एव्हरग्रीन आशा भोसलेंचा आज वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक जंगी कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी सुधीर गाडगीळ यांनी त्यांची मुलाखत घेतली आणि आशाताईंनी दिलखुलासपणे उत्तरं दिली. पाहूया त्या काय म्हणाल्या?

Sonali Deshpande
'सुरुवातीला मला दीदी म्हणायची तू मोठ्यानं का गातेस, मी म्हणाले, तुला ऐकू जावं म्हणून' 'आजच्या टीव्ही शोमध्ये नाचून गात असतात, ॲक्टिंग करून गाणं मला योग्य वाटत नाही' 'आजकाल १००-२०० डिजिटल ट्रॅक आले आहेत, त्याला काही अर्थ नाही'

'मी आणि दीदींनी मिळून ९० गाणी एकत्र गायली आहेत' 'दीदी नखरे करायची नाही तर अधिक गाणी झाली असती' ऐ मेरे वतन के लोगोवर आशाताईंनी मार्मिक उत्तर दिलं, जी देण्यात मजा आहे ती घेण्यात नाहीये' 'कधी माझी गाणी इतरांनी गायली तर इतरांची गाणी माझ्याकडे आली' 'जी बाई घरातलं राजकारण सांभाळू शकली नाही ती देशाच्या राजकारणाचा काय विचार करणार' 'माझं आत्मचरित्र लिहून तयार आहे' 'माझ्या मुलीने स्वत:ला गोळी मारुन घेतली ते मी कसं सहन केलं असेल' 'मी कधी कुणाचं वाईट केलं नाही मग एव्हढी दुःख का ?' 'माझ्यातला कलाकार जोपर्यंत जिवंत तोपर्यंत मी जिवंत आहे'

Trending Now