आनंद आहुजाच्या वाढदिवसाला मेव्हणीचं अनोखं गिफ्ट

सोनम कपूरचा पती आनंद अाहुजाचा लग्नानंतरचा वाढदिवस खूपच स्पेशल ठरला. सोनमची बहिण रियाने आनंदसाठी खास बुटाच्या आकाराची फ्लॉवर अरेंजमेंट भेट म्हणून दिली.

मुंबई, 30 जुलै : सोनम कपूरचा पती आनंद अाहुजाचा लग्नानंतरचा वाढदिवस खूपच स्पेशल ठरला. सोनमची बहिण रियाने आनंदसाठी खास बुटाच्या आकाराची फ्लॉवर अरेंजमेंट भेट म्हणून दिली. आनंद अहुजा स्नीकर फॅन आहे त्यामुळे ही भेट त्याला खूप आवडली. तर सोनम कपूरने आनंदसाठी एक खास केक तयार करून घेतला होता, ज्यावर 'लेकर्स' या लॉस एंजेलिसच्या बास्केटबॉल टीमचं डिझाइन होतं. आनंद या बास्केटबॉल टीमचा चाहता आहे. आनंद अहुजाचा वाढदिवसाचं सेलिब्रेशन  फार थाटामाटात न करता फक्त कुटुंबियांसोबत करणं सोनमने पसंत केलं.पण या हटके गिफ्ट्समुळे सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाले आहेत.

आनंदचे सासरे अनिल कपूर यांनीही ट्विट करून आपल्या जावयाला शुभेच्छा दिल्यात. 'तू तुझं स्वप्न साकार केलंस. आणि आता तू त्या स्वप्नवत जगात आहेस' असं अनिल कपूरनं म्हटलंय.

सोनम कपूरनंही शुभेच्छा देताना आपल्या नवऱ्याला म्हटलंय, तुझ्यामुळे माझं आयुष्य खूप चांगलं झालंय.

सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांची जोडी एकदम हिट आणि हाॅटही आहे. तुम्ही कुठेही या दोघांना पहा. दोघं एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले दिसतात. मग एखादा विमानतळ असो, नाही तर इव्हेंट. सोनम आणि आनंद अगदी मेड फाॅर इच अदर वाटतात. आता वांद्र्याला दोघं कारमधून उतरले. दोघंही आनंदात दिसतात. आणि अचानक आनंदनं सोनमला उचललं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.सोनम आणि आनंदचं लग्नही खूप थाटामाटात झालं. दोघांचं ग्लॅमरस लग्न टाॅक आॅफ द टाऊन होतं. बाॅलिवूड सेलिब्रिटींनी उत्साहानं हजेरी लावली होती. त्यानंतर आनंदचा आलेला हा पहिलाच वाढदिवस.

Trending Now