अमिताभ बच्चन यांनी उचलला २०० शेतकऱ्यांच्या कर्जाचा भार

शेतकरी आत्महत्या का करत आहेत आणि त्यांना एवढं कर्ज का घ्यावं लागतं या गोष्टींकडे कानाडोळा करुन चालणार नाही

मुंबई, २९ ऑगस्ट- दुष्काळ आणि त्यात डोक्यावर कर्ज यामुळे राज्यात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. पण आता त्यांच्या मदतीला चक्क महानायकच आला आहे. अमिताभ बच्चन २०० शेतकऱ्यांच्या कर्जाची रक्कम ते स्वतः भरणार असल्याचे सांगितले. त्यांच्या या कार्यामुळे ते पडद्यावरचेच नाही तर पडद्यामागचेही नायक असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले.इंडियन एक्स्प्रेसने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, २०० शेतकऱ्यांच्या कर्जाची एकूण रक्कम १ कोटी २५ लाख रुपये इतकी आहे. बिग बींनी ही सर्व रक्कम कर्जाने बेजार झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात भरले. कौन बनेगा करोडपती या रिअलिटी शोचे १० वे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतीच या शोशी निगडीत पत्रकार परिषद मुंबईमध्ये पार पडली. या पत्रकार परिषदेतच बच्चन यांनी २०० शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची घोषणा करत, ‘शेतकरी आत्महत्या का करत आहेत आणि त्यांना एवढं कर्ज का घ्यावं लागतं या गोष्टींकडे कानाडोळा करुन चालणार नाही,’ असेही ते म्हणाले. अमिताभ बच्चन यांनी याआधीही ५० शेतकऱ्यांचे कर्ज फेडले होते.आपल्या दानधर्माबद्दल बच्चन यांना फार बोललेलं आवडत नाही. अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला मनापासून समाजासाठी काही तरी करायला प्रवृत्त करते, या प्रश्नाचं उत्तर देताना बिग बी म्हणाले की, 'अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यामुळे मी प्रवृत्त होतो. मी पोलीओमुक्त भारताच्या कॅम्पेनमध्ये अनेक वर्ष सक्रीय होतो. सुदैवाने भारत आज पोलीओमुक्त आहे. सध्या मी टीबी आणि हॅपीटायटीस बी या आजारांबद्दल जनजागृती करत आहे. मला टीबी आणि हॅपीटायटीस बी हे दोन्ही आजार झाले आहेत. याबद्दल सांगताना मला अजिबात लाज वाटत नाही. फक्त मला त्यानंतर मिळणारी सहानुभूती नको असते, म्हणून याबद्दल मी फारसं बोलत नाही. पण लोकांनी योग्य वेळेत सर्व चाचणी करुन घ्यावी असे मला वाटते.'

VIDEO : न चूकता विठ्ठलाला नतमस्तक होणारा 'तेजा'काळाच्या पडद्याआड!

Trending Now