जुन्या पोस्टमुळे अक्षय कुमार झाला ट्रोल, गपचूप ट्विट केलं डिलीट

आता पेट्रोलचे दर गगणाला भिडलेले असताना अक्षय कुमार काहीच का बोलत नाही ? असा प्रश्न आता सोशल मीडियावर सगळ्यांना ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांनी विचारला आहे.

Renuka Dhaybar
मुंबई, 23 मे : मास्टर ब्लास्टर अक्षय कुमार हा नेहमीच आपल्या हटके स्वभावामुळे सोशल मीडियावर चर्चेत असतो. तो नेहमी आपल्या चाहत्याशी संपर्कात असतो. आणि समाजात होणाऱ्या अनेक घटनांवर तो नेहमी व्यक्त होतो. पण यावेळी मात्र त्याला त्याचे जवळपास 6 वर्ष जुने ट्विट चागंलेच महागात पडले आहे. अक्षयने यूपीए सरकारमधील पेट्रोल दर वाढीवर 6 वर्षांआधी ट्विट केलं होतं.त्यात त्याने लिहलं होतं की, 'पेट्रोलची किंमत ज्याप्रकारे वाढतेय, त्यावरून मला असं वाटतंय की आता आपल्याला धूळखात पडलेली सायकल साफ करून रस्त्यावर उतरवावी लागणार आहे'. दरम्यान, त्यावेळी पेट्रोलचे दर हे प्रती लिटर 75 ते 76 रूपये होते. तर आत्ता हे दर 80 रूपयांच्या वर गेले आहेत.

आता पेट्रोलचे दर गगणाला भिडलेले असताना अक्षय कुमार काहीच का बोलत नाही ? असा प्रश्न आता सोशल मीडियावर सगळ्यांना ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांनी विचारला आहे.अक्षयला ऐवढ्या सगळ्यांनी ट्रोल केलं की, काही विचारूच नका. मग काय हुशार अक्षयने ते ट्विट गपचूप आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन डिलीट केले. युपीए सरकारच्या काळात अनेक सेलिब्रिटींनी पेट्रोल दरवाढी बाबत आपली नाराजी व्यक्त केली होती. यामधे अमिताभ बच्चन, अनुपम खेर, परेश रावल यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी आपली नाराजी सोशल मीडियावरून व्यक्त केली होती. पण आता मात्र सगळेच गप्प आहेत. 

Trending Now