सोनालीनं केलं अक्षयच्या 'चुंबक'चं कौतुक

अक्षय कुमारनं प्रेझेंट केलेला 'चुंबक' आज रिलीज झालाय. आणि त्याचं अनेक कलाकारांनी ट्विट करून कौतुक केलंय.

मुंबई, 27 जुलै : अक्षय कुमारनं प्रेझेंट केलेला 'चुंबक' आज रिलीज झालाय. आणि त्याचं अनेक कलाकारांनी ट्विट करून कौतुक केलंय. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं अक्षयला त्यानं मराठी सिनेमात लक्ष घातल्याबद्दल अभिमान वाटतोय म्हटलंय. तर रितेश देशमुखनं चुंबकबद्दल अक्षयचं कौतुकच केलंय.

'चुंबक' या मराठीत मुख्य भूमिका लेखक, गीतकार स्वानंद किरकिरे यांनी साकारलीय. त्यांच्यासोबत काही नवोदित कलाकार आहेत. सिनेमाच्या टीमने काही दिवसांपूर्वी हा सिनेमा अक्षय कुमारला दाखवला. त्यानंतर हा सिनेमा त्याच्या डोक्यातून काही केल्या जाऊ शकला नाही. त्यामुळे अखेर त्याने हा सिनेमा प्रस्तुत करण्याचा निर्णय घेतला.

एक छोटा मुलगा, ज्याचा माणुसकीवरचा विश्वासच उडतो. तो त्याला कसा परत मिळतो, यावरच हा सिनेमा आहे.या सिनेमामुळे अक्षय कुमारचे नाव परत एकदा मराठी सिनेसृष्टीशी जोडलं गेलंय. 2013ला '72 मैल एक प्रवास' या मराठी सिनेमाची निर्मिती अक्षय कुमारनेच केली होती. या सिनेमाला आता 5 वर्ष झाले आहेत. म्हणजे अगदी 5 वर्षांनंतर अक्षय कुमार पुन्हा मराठी सिनेमाशी जोडलाय. त्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी एक पर्वणीच आहे असं म्हणायला हरकत नाही.माधुरी दीक्षित, प्रियांका चोप्रा, जाॅन अब्राहम, श्रेयस तळपदे, अजय देवगण, तनुजा, रितेश देशमुख, सोनाली बेंद्रे वेगवेगळ्या कारणांनी मराठी सिनेमाशी जोडले गेलेत. बाॅलिवूडला मराठी सिनेमांचा दर्जा लक्षात आलाय. त्यामुळे चांगल्या, कसदार विषयांना चांगल्या निर्मितीची साथ मिळतेय. 

Trending Now