नाट्यसंमेलनाची तयारी जोरात,8 दिवस चालणार कार्यक्रम

97वं अखिल भारतीय नाट्यसंमेलन हे उस्मानाबाद होणार आहे.येत्या रविवारी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन होऊन संमेलनाला सुरुवात होईल.

Sonali Deshpande
17 एप्रिल : 97वं अखिल भारतीय नाट्यसंमेलन हे उस्मानाबाद होणार आहे.येत्या रविवारी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन होऊन संमेलनाला सुरुवात होईल. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी नाट्य परिषद आणि उस्मानाबादकरांनी देखील जोरदार तयारी केली आहे.रविवारी नाट्यपरिषदेच्या वतीनं नाट्यमहोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. याच नाट्य महोत्सवाचं उद्घाटन माझी मंत्री मधुकर चव्हाण, खासदार रवींद्र गायकवाड आणि स्वागत अध्यक्ष सुजितसिंह ठाकूर तसंच ज्येष्ठ रंगकर्मी श्रीकांत नाडापुढे आणि नाट्यपरिषदेचे प्रमुख कार्यवाहक दीपक करंजीकर यांच्या उपस्थित पार पडलं.या पहिल्याच नाट्यपरिषदेच्या कार्यक्रमला उस्मानाबादकारांनी प्रचंड गर्दी केली होती.अखिल भारतीय नाट्यसंमेलन हे केवळ तीन दिवसांचं असंत.मात्र पहिल्यांदाच उस्मानाबादमध्ये ह्या संमेलनात 8 दिवस कार्यक्रम चालणार आहेत.तसंच या संमेलनाचं वैशिष्ठ्य म्हणजे यंदा पहिल्यांदाच संमेलन गीत तयार करण्यात आलंय. संमेलन गीत परंपराही पुढे कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

Trending Now