मुंबई, 27 मार्च : मुंबई पोलिसांनी 15 वर्षांपूर्वी फरार झालेल्या एका आरोपीला पकडले होते. जामिनावर सुटल्यानंतर तो फरार झाला होता. त्यामुळे न्यायालयाने त्याला फरार घोषित केले होते. अनेक वर्षे शोध घेऊनही पोलिसांना त्याचा सुगावा लागला नाही. यादरम्यान त्याच्या पत्नीचाही मृत्यू झाला. त्याने कुटुंबाशी कोणत्याही प्रकारचा संपर्क ठेवला नाही. अशा स्थितीत त्याचाही मृत्यू झाल्याचा पोलिसांचा अंदाज होता. पण, त्यानंतर पोलिसांच्या हाती एक सुगावा लागला आणि 15 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीपर्यंत पोलीस पोहोचले.
ही घटना मुंबईतील रफी अहमद किडवई मार्ग पोलीस ठाण्याशी संबंधित आहे. 2008 मध्ये पोलिसांनी अर्मुगम देवेंद्र आणि त्याच्या एका साथीदाराला येथील समुद्रात उभ्या असलेल्या जहाजातून तेल चोरल्याप्रकरणी अटक केली होती. या प्रकरणात नंतर देवेंद्रला कोर्टातून जामीन मिळाला. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर न्यायालयाने देवेंद्रचा जामीन फेटाळला. तेव्हापासून तो न्यायालयात तसेच पोलीस ठाण्यातही हजर झाला नाही.
पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, त्याचा कोणताही सुगावा लागला नाही. न्यायालयाने त्याला फरार घोषित केले होते. त्याने स्वत:ला कुटुंबीयांपासून वेगळे केले होते. यादरम्यान त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला. त्यामुळे आता त्याची ओळख पटवण्याचा कोणताही मार्ग उरला नसल्याचे पोलिसांना वाटले होते.
Political news : अमित शाहांची सभा नांदेडमध्येच का? चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट!
Weather Update Today : उष्म्यापासून मिळणार का दिलासा? चेक करा संभाजीनगरसह 6 शहरांचं तापमान
Mumbai Mega Block : मुंबईकरांनो, रविवारी असेल ‘या’ मार्गावर मेगाब्लॉक, बाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या वेळापत्रक
'मनोजसोबत लग्न केलं होतं, पण या कारणामुळे सरस्वतीने घरच्यांपासून लपवलं'
Marriage : अरेंज की लव्ह, कोणतं मॅरेज बेस्ट? धक्कादायक आकडेवारी समोर
मोठी बातमी! सुप्रिया सुळे, पटेल राष्ट्रवादीचे नवे कार्यकारी अध्यक्ष; अजित पवारांकडे कोणतीही जबाबदारी नाही
Cyclone Biparjoy : बिपरजॉय चक्रीवादळाबाबत हवामान खात्याकडून मोठी अपडेट; समुद्र किनाऱ्यावरील गावांना सर्तकतेचा इशारा
Congress : काँग्रेसनेही भाकरी फिरवली, मुंबई अध्यक्षपदावरून भाई जगताप यांची उचलबांगडी, नव्या चेहऱ्याला संधी
अचलपूरमध्ये धावत्या दुचाकीचा भीषण स्फोट; शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू
Live Updates : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची हजेरी
Mira Road Murder : सरस्वती आणि मनोज साने सोसायटीत कसे राहत होते? शेजाऱ्यांनी केला मोठा खुलासा
हात धुण्यासाठी शेतकरी उतरला नदीच्या पाण्यात अन् मगरीने साधला डाव, पुढे झालं ते भयानक
दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका खबऱ्याने स्थानिक पोलिसांना देवेंद्रची माहिती दिली होती, पण पोलिसांसमोर त्याला ओळखण्याचे खरे आव्हान होते. देवेंद्र पहिल्यांदा पकडला गेला तेव्हा तो 48 वर्षांचा होता. अशा परिस्थितीत वयाच्या 63 व्या वर्षी 15 वर्षांनी त्याची ओळख पटवणे सोपे नव्हते. दरम्यान, पोलिसांनी त्याची जुनी फाईल उघडली असता त्यात एक फोटो मिळाला. मात्र, यावरूनही त्याला ओळखणे सोपे नव्हते. फाइलची अधिक छाननी केली असता त्यात आणखी एक फोटो आढळून आला. हा फोटो त्याच्या हातावर बनवलेल्या टॅटूचा होता. हा फोटो मिळाल्यानंतर पोलिसांचा मार्ग सुकर झाला. पोलिसांनी त्याला पकडले आणि टॅटूची पडताळणी करून त्याला जेरबंद केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags:Crime news, Local18, Marathi news, Mumbai police