नितेश राणेंनी मच्छीमार वादात का घेतली उडी ?

वरवर ही घटना मामुली वाटत असली तरी यात चालून आलेली संधी न दवडता नितेश राणेनी फेकलेला हा फक्त मासा नव्हेतर 'राजकीय' फासा आहे !

Chandrakant Funde
 दिनेश केळुसकर, सिंधुदुर्ग6 जुलै : नारायण राणेंचे आमदार पुत्र नितेश यानी आज पारंपरिक आणि पर्ससीन मच्छीमार वादात उडी घेत मालवणच्या मत्स्यव्यवसाय आयुक्तांना अरे-तुरेची भाषा वापरत त्यांच्या कार्यालयातच त्यांच्यावर मासा फेकून मारला ! आणि बेकायदा मासेमारीवर कारवाई नाही केलीत तर नितेश राणेशी गाठ आहे, असंही सुनावलं ! वरवर ही घटना मामुली वाटत असली तरी यात चालून आलेली संधी न दवडता नितेश राणेनी फेकलेला हा फक्त मासा नव्हेतर 'राजकीय' फासा आहे !

पुढे विद्यमान शिवसेना आमदार वैभव नाईक यानी पाठपुरावा केल्यावर राज्य सरकारने पर्ससीन मासेमारीवर निर्बंध आणत पर्ससीन मासेमारीचा कालावधी आणि किनाऱ्यापासूनचं अंतर निश्चित केलं आणि या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व मत्स्यव्यवसाय आयुक्तांना दिले. पण त्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे हे वाद सुरूच राहिले. तशातच भाजपाचे मत्स्यव्यवसाय मंत्री पर्ससीन बंदीच्या कालावधीत सिंधुदुर्गात आले आणि त्यांनी चक्क एका पर्ससीन मच्छीमारासोबत समुद्रात जाऊन पर्ससीन मासेमारी कशी करतात याचं प्रात्यक्षिक पाहिलं. जानकरांची ही कृती पारंपरिक मच्छीमारांच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरली आणि सरकारचेच मंत्री जर कायदा मोडत असतील तर भाजपा आपल्याला या बाबतीत काय न्याय देणार, अशी भावना मच्छीमारात तयार झाली. दुसरीकडे जानकरांच्या या कृतीचा शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी साधा निषेधही केला नसल्यामुळे शिवसेना सरकारमध्ये असूनही आणि राणेंचे विरोधक शिवसेना आमदार दीपक केसरकर पालकमंत्री असूनही आपले प्रश्न सुटत नसतील तर सेनेच्या आमदारामागे तरी किती वेळा फिरणार ? असा समज या पारपरिक मच्छीमारात दृढ होऊ लागला आणि नेमकी हीच तात्कालीक संधी नितेश राणेना पुन्हा चालून आलीय.

Trending Now