सिरोंचावासी डाॅ.क्रिस्टोफर यांचे नेहमीच ऋणी राहतील

ह्दयविकाराच्या झटक्याने डाॅ आय जे क्रिस्टोफर यांचा मृत्यु झाला. पहाटे प्रकृती बिघडल्यावर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र त्यांना वाचवता आले नाही.

Sonali Deshpande
महेश तिवारी, मुंबईसिरोंचा माझं मूळ गाव. मुंबई राजधानीपासून 1500 तर नागपूर 400 तसेच गडचिरोली जिल्हा मुख्यालय 220 किमी असलेला  महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरचा तालुका. अशा दुर्गम भागात आरोग्याची सेवा देणारे डाॅ. आय जे क्रिस्टोपर यांचा  मृत्यू झालाय.  या सिरोंचा तालुक्यात आरोग्याच्या सोयी अजूनही नाहीत. मलेरिया गॅस्टोमुळे जीव गमावणारे रुग्ण सोबतच शस्त्रक्रियेची प्रसुती वेळेवर न झाल्याने गर्भवती मातांचा मृत्यू होणारा हा भाग आहे.हा तालुका तीनही बाजूने नद्याच्या विळख्यात असलेला. त्यामुळे पावसाळ्यातले तीन महिने जगाशी संपर्क तुटणारा परिसर. अशा ठिकाणी सरकारी ग्रामीण रुग्णालय असलं तरी एमबीबीएस दर्जाचे डाॅक्टर बहुधा नसलेले. गंभीर उपचार तिथे होऊ शकत नाहीत. शस्त्रक्रियेची प्रसुतीसह जळालेल्या किंवा अपघाताच्या रुग्णांना 220 किमी अंतरावरील चंद्रपूर किवा लगतच्या तेलंगणातल्या वारंगल हैदराबादशिवाय पर्याय नाही.  तिथं  नेईपर्यंत मलेरिया तापाचा अपघाताचा ह्रदयविकाराचा रुग्ण असेल किंवा गर्भवती मातांचे मृत्यू झाल्याच्या अनेक घटना लहानपणापासून बघितल्या आहेत.

अशा भागात  तेलंगणाच्या घनपूरमध्ये जन्मलेले डाॅ आय जे क्रिस्टोफर (MBBS..MS जनरल सर्जन) हे 1983 मध्ये सिरोंचात दाखल झाले सिरोंचा इथ असलेलं ख्रिश्चन मिशनरी रुग्णालयाच्या माध्यमातून त्यांनी सिरोंचात आरोग्याच्या सोयी उपलब्ध करुन दिल्या. त्या काळात शस्त्रक्रियेद्वारे गर्भवती महिलेची प्रसुती सिरोंचातच डाॅ क्रिस्टोफर यांनी केली.1987 मध्ये डाॅ क्रिस्टोपर सिरोंचाहून बाहेर गेले आणि 1996 मध्ये सिरोंचाला परतले. मिशन हास्पिटलमधून परत रुग्णांची सेवा केली. काही कारणामुळे व्यवस्थापनाशी मतभेद झाल्यानंतर हे रुग्णालय क्रिस्टोफर यांनी सोडलं. नंतर सिरोंचा सोडून बाहेर निघून गेले. तेलंगणात कागजनगर आसिफाबाद इथं त्यांनी काम केलं. मात्र सिरोंचाची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नसल्याने ते पाच वर्षापूर्वी सिरोंचाला परतले आणि सिरोंचातील एमडीएम या खासगी रुग्णालयात ते रुजू झाले.इथंही शेकडो गर्भवती महिलांची प्रसुती त्यांनी केली  हार्ट अटॅक सर मलेरिया गॅस्ट्रो अपघातासह इतर उपचारावर सिरोंचा तालुक्यातल्या नागरिकांना तात्काळ डाॅ. आय जे क्रिस्टोफर यांचीच आठवण यायची आणि वंरगल मंचेरियाल सारख्या तेलंगणातल्या शहरात जाण्यापूर्वी सिरोंचात डाॅ. क्रिस्टोफर याच्याकडून तात्काळ उपचार मिळायचे.ह्दयविकाराच्या झटक्याने डाॅ आय जे क्रिस्टोफर यांचा मृत्यु झाला. पहाटे प्रकृती बिघडल्यावर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र  त्यांना वाचवता आले नाही. दुर्दैव ज्या सरकारी रुग्णालयात जाणं टाळुन लोक गावातला पहिला पर्याय म्हणून त्यांच्याकडे जायचे त्याच डाॅ क्रिस्टोपर यांना तिथं न्यावं लागलं.मात्र मृत्यू ठरलेला होता.असो. हे एवढं लिहिण्याचं कारण माझ्या गावातच काय अख्ख्या सिरोंचा तालुक्यात सर्वाधिक शिकलेला आणि एकमेव अनुभवी डाॅक्टर आम्ही गमावलाय. आजही दुर्दैव आहे. आता डाॅ क्रिस्टोफर यांच्या मृत्युनंतर माझ्या तालुक्यात एकही मोठा डाॅक्टर माझ्या गावात आता नाही. तात्काळ कधी गरज पडली तर सिरोंचावासी कुणाकडे जातील असा कठीण प्रसंग आता तयार झाला आहे. शहरात अनेक पर्याय उपलब्ध असले तरी दुर्गम भागात आजही अशा डाॅक्टरची कमतरता आहे.डाॅ आय जे क्रिस्टोफर यांच सिरोंचावरच विशेष प्रेम असं आहे की डाॅक्टर पत्नी हैदराबादेत, मुलगा विदेशात मात्र त्यांना सिरोंचा आवडायचं. जीव गेला तर याच गावात गेला पाहिजे असे ते म्हणायचे  आणि तेच झालं, ग्रामीण रुग्णालयातून त्याना वारंगलला नेण्यासाठी रुग्णवाहिकेत ठेवण्यात आले आणि तिथेच त्यांनी प्राण सोडला. सिरोंचावासी डाॅक्टरला मिस करतील हे माञ नक्की.

Trending Now