ही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती!

ती गेली... मुक्त झाली... असं वाटत असेल तर ते खोटं आहे... माणसांचा नराधमपणा इथेच थांबत नाही. कठुआतला रानटीपणा वाचून डोकं बधीर झालंय. वाटतंय उठावं आणि घालाव्यात गोळ्या नराधमांना.

Ajay Kautikwar
विलास बडे, प्रतिनिधी, न्यूज18 लोकमतराञीचे दोन वाजलेत पण झोप लागत नाहीय. संताप, चीड, अस्वस्थता ज्वालामुखीसारखी आत खदखदतीय. तिला बाहेर काढण्यासाठी म्हणून बदडत बसलोय बेराञी किबोर्डची बटणं. कठुआतला रानटीपणा वाचून डोकं बधीर झालंय. वाटतंय उठावं आणि घालाव्यात गोळ्या नराधमांना.8 वर्षाचं कोवळं लेकरू. तिचं अपहरण केलं जातं, बलात्कार केला जातो, पुन्हा पुन्हा तिच्या शरीराचे लचके तोडले जातात... नशेचं इंजक्शन टोचलं जातं, ती बधीर होते...तरीही नराधम तिला भोगत राहातात. तिच्या डोक्यात दगड घालून ठेचलं जातं. शरीर रक्तानं माखलं. शरीररातून प्राण गेला, तरी निष्प्राण देहावरही लिंगपिसाट कुञे तुटून पडले.

ती गेली... मुक्त झाली... असं वाटत असेल तर ते खोटं आहे... माणसांचा नराधमपणा इथेच थांबत नाही. तिच्या बलात्कार आणि हत्येचं आरोपपत्रं दाखल करायला पोलिस कोर्टात निघाले. दारावर काळ्या डगल्यांनी आडवलं. कथित हिंदुत्ववादी रस्त्यावर उतरले. भारत माता की जयच्या घोषणा दिल्या. तिरंगा फडकवत रस्त्यानं जथ्ये नाचू लागले. बलात्काऱ्यांच्या, खुन्यांच्या बाजूनं. कारण ती धर्मानं मुसलमान होती आणि आरोपी हिंदू.लहानपणी आईच्या मांडीवर झोपून ऐकलेला हा हिंदू धर्म नाही. आरोपींना जात,धर्म,लिंग,वय काहीही नसते. आरोपी हा आरोपीच असतो. अशा घटनांचं चुकूनही समर्थन करणारे हे मानवतेचे पहिले शत्रू आहेत. 8 वर्षाच्या त्या लेकराला कसला आलाय धर्म? हैवानांच्या समर्थनार्थ तिरंगा घेवून नाचवणाऱ्या धर्मांधळ्यांनो, तुमच्या जिंदगीवर थू...

Trending Now