तुझा लढा सुरूच...

Samruddha Bhambure
कधी शबरीमलासाठीकधी शिंगणापुरसाठीकधी आरक्षसणासाठी

कधी हुंडाबळी थांबवण्यासाठीतुझी आन्दोलनं सुरूच आहेतप्रत्येक वेळी नाव वेगळ असलं तरीहक्कासाठी,न्यायासाठीया आंदोलनाना कदाचित यश येईलहीमिळेलही प्रवेश तुला चौथऱ्यावरथांबतीलही कदाचित हुंडा बळीमिळेलही कदाचित तुला समान संधी कागदावर तरीपण त्या लढयाचं काय करशील गं?जो अवीरतपणे सुरु आहेतुझ्या जन्मपासून मृत्युपर्यंतजो संक्रमित होतो पुढच्या पिढीत वारसाहक्कानं मिळालेल्या संपत्तिसारखाहवं ते बोलण्याचाहवं ते खाण्याचाहवे ते कपडे घालण्याचामनमुराद हसण्यासाठीचाआणि तो लढा जिंकू शकशील?जन्माला येण्याचा आणि येऊ देण्याचा?- केतकी जोशी, IBN लोकमत
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Trending Now