भाषा निवडा :

मराठी
पुढची बातमी
Sanjeevani चे जनजागृतीचे व भारतामध्ये लसीकरणासाठी मदतीचे कार्य चालूच

औरंगाबादकरांसाठी मोठी बातमी, नियमावलीमध्ये मोठा बदल

जिल्ह्यातील आठवडी बाजार भरविण्यावर बंदी असून, भाजी मंडई सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

औरंगाबाद, 17 एप्रिल : औरंगाबादमध्ये (Aurangabad corona) कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे लॉकडाऊनची कडक अंमलबाजवणी सुरू आहे. वाढती रुग्ण संख्या पाहता जिल्ह्याधिकाऱ्यांनी संचारबंदीत आणखी बदल केले आहे.

औरंगाबाद शहरात सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे. त्या नतर नागरिकांना बाहेर पडता येणार नाही. रमजान निमित्त सायंकाळी 5 ते 8 फळं विक्रीस परवानगी देण्यात आली आहे.

तसेच नवीन आदेशातील नमूद करण्यात आलेल्या अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ठ असलेल्या सेवा आणि आस्थापना यांना सूट देण्यात आलेल्या वेळेमध्ये बदल करण्यात आले आहे.  हे आदेश संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यासाठी लागू राहतील. जिल्ह्यातील आठवडी बाजार भरविण्यावर बंदी असून, भाजी मंडई सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

.क्र.विषयसुरु ठेवण्याची कालमर्यादा
1.संचारबंदी
1.1नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरणेअत्यावश्यक कारण/ अत्यावश्यक सेवेशिवाय नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई राहिल.
1.2अत्यावश्यक सेवा देणारे अधिकारी/ कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित असणारे अधिकारी/ कर्मचारी, ओळखपत्रासह संचार करण्यास परवानगी. ओळखपत्र रिबीनने गळ्यात लावणे (24 तास)
1.3संचारबंदीमधून रुग्णालय, रोग निदान केंद्र, चिकित्‍सालय , लसीकरण केद्रें, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने, औषधे  निर्मिती उद्योग इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा यांचा त्यांना आवश्यक अशा अनुषंगिक उत्पादन आणि    वितरण तसेच वितरक, वाहतूक आणि पुरवठा साखळी यांचा देखील समावेश असेल. लस, निर्जतुके, मास्क, वैद्यकीय उपकरणे, त्यांना सहाय्यभुत  कच्चा माल उद्योग आणि अनुषंगिक सेवा यांचे उत्पादन व वितरण यांचादेखील समावेश असेलपूर्ण वेळ : (24 तास)
1.4कोविड चाचणी : लसीकरणपूर्ण वेळ : ( 24 तास)
1.5पशुवैद्यकीय दवाखाने, पाळीव प्राणी संगोपन केंद्र, पाळीव प्राणी, पशुखाद्याची दुकाने, Pet Shop, कृषि संबंधित सेवा बियाणे, खते, अवजारे व त्यांची दुरुस्ती इ.फक्त : सकाळी 7 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत
1.6अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने (किराणा, भाजीपाला, फळे, डेअरी, बेकरी, मिठाई दुकाने, खाद्यपदार्थांची दुकाने पार्सल सेवा, चिकन, मटण, अंडी, मासे, पोल्ट्री दुकाने, गॅस सिलेंडर पुरवठा, ॲटोमोबाईल्स दुकाने) : गॅरेजफक्त : सकाळी 7 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत
1.7ऑप्टीकल्स-चष्मा दुकानेफक्त : सकाळी 7 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत
2.शासकीय कार्यालये
2.1आरोग्य सेवा, वीज, पाणी, बँकींग, वित्तीय सेवा, आपत्ती व्यवस्थापन

 

100 % उपस्थिती (ओळखपत्र लावणे अनिवार्य)
2.2स्थानिक प्राधिकरणाच्या अत्यावश्यक सेवापूर्ण वेळ : ( 24 तास)
2.3इतर शासकीय कार्यालये50 % उपस्थिती (कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी चालू ठेवायचे असल्यास शासकीय विभागांचे/कार्यालयांचे प्रमुख (HOD) यांचे निर्णयानुसार 100% क्षमतेने सुरु - ओळखपत्र लावणे अनिवार्य)
2.4शासकीय बैठकाफक्त ऑनलाईन पद्धतीने
2.5शासकीय कार्यालयांमध्ये विनापरवानगी (Walking) अभ्यागतांना प्रवेश (पोलीस स्टेशन वगळता)प्रवेश बंदी
2.6शासकीय कार्यालयात कार्यालयप्रमुखाची पूर्वपरवानगी घेऊन भेट देणारा अभ्यागतभेट देण्यापूर्वी 48 तासांच्या आत RTPCR/ RAT/ TruNAT/ CBNAAT Test चाचणी निगेटिव्ह असेल तरच प्रवेश
3.निमसरकारी- खाजगी कार्यालये
3.1बँका, वीज वितरण कंपनी, टेलिकॉम कंपन्या, विमा, मेडीक्लेम कंपनी, औषधी वितरण/उत्पादन कार्यालयेपूर्ण वेळ : ( 24 तास)
3.2इतर सर्व खाजगी कार्यालयेबंद
3.3SEBI SEBI अंतर्गत मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर्स संस्था उदा. स्टॉक एक्सचेंजेस, गुंतवणूक व क्लिअरिंग कार्पोरेशन्स, SEBI अंतर्गत नोंदणीकृत संस्था, RBI अंतर्गत नोंदणीकृत व मध्यवर्ती संस्था उदा. स्वतंत्र प्राथमिक डिलर्स, CCIL, NPCL, पेमेंट सिस्टीम ऑपरेटर्स, फायनान्शिअल मार्केट, सर्व प्रकारचे Non-Banking वित्तीय संस्था, सर्व सूक्ष्म वित्तीय संस्था, CA, वकीलांचे कार्यालये, कस्टम हाऊस एजंट/लसीकरणाशी संबंधित परवानाधारक मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर/जीवरक्षक औषधे/औषधी उत्पादनेफक्त : सकाळी 7 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत
3.4बोर्ड, विद्यापीठ किंवा प्राधिकरण यांची परीक्षा घेण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची परवानगी घेऊनपरीक्षार्थी व परीक्षेसाठी नियुक्ती असणारे अधिकारी/कर्मचारीसूट (सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत)
4अत्‍यावश्‍यक सेवा
4.1रेल्वे, टॅक्सी, ऑटो, सार्वजनिक बस सेवा, स्थानिक स्वराज्य संस्थेची मान्सून पूर्व कामे, मालवाहतूक, स्थानिक प्राधिकरणांच्या सार्वजनिक सेवा, मान्यताप्राप्त मिडीयापूर्ण वेळ : ( 24 तास)
4.2बस, रेल्वे, विमान यांद्वारे प्रवास करणा-या प्रवाशांना घरापासून बसस्थानक, रेल्वे स्थानक, विमानतळापर्यंत व तेथून घरापर्यंत जाण्यासाठी परवानगीवैध तिकीटाचे आधारे परवानगी राहिल.
4.3उद्योगांमध्ये काम करणारे कामगार यांना कामावर जाण्यासाठीची परवानगीवैध ओळखपत्राचे आधारे परवानगी राहिल.

(10% व्‍यवस्‍थापकीय कर्मचारी ) : ओळखपत्र रिबीनसह गळ्यात

4.4दुकाने, बाजारपेठ, मॉल्स (अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने वगळून)बंद राहतील.
4.5पेट्रोल पंप व पेट्रोलियमशी संबंधित उत्पादन, कार्गो सेवा, डाटा सेंटर्स/क्लाउड सर्व्हिस पुरवठादार/माहिती व तंत्रज्ञान सेवेशी संबंधित सेवा, शासकीय/खाजगी सुरक्षा सेवा, गॅरेजेस, टायर पंक्चर दुकाने, दूरसंचार सेवा सुरळित राहण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबी/सेवाअत्यावश्यक सेवेसाठी पूर्ण वेळ : 24 तास

नागरिकांसाठी : सकाळी 7 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत

5        खाजगी वाहतूक व्‍यवस्‍था
5.1ऑटोरिक्षापूर्ण वेळ : (24 तास) - चालक व 2 प्रवासी फक्त (Driver + 2 Passengers only) ,

नियमांचा भंग केल्‍यास दंड रु.500/-

5.2टॅक्सी/कॅबपूर्ण वेळ :(24 तास) - चालक व परिवहन नियमांनुसार अनुज्ञेय क्षमतेच्या 50 % वाहन क्षमता (Driver + 50 % vehicle capacity as per RTO) नियमांचा भंग केल्‍यास प्रवासी व चालक प्रत्‍येकी दंड रु.500/-
5.3सार्वजनिक बस सेवापूर्ण वेळ : 24 तास - परिवहन विभागाच्या मान्यतेनुसार पूर्ण आसन क्षमतेने परवानगी आहे. परंतु प्रवाशांना उभे राहून प्रवास करण्यास  मनाई राहिल.
5.4रेल्वेपूर्ण वेळ :(24 तास) - विनामास्क व उभे राहून प्रवास करण्यास  मनाई राहिल.

नियमांचा भंग केल्‍यास दंड रु.500/--

5.5खाजगी वाहने, खाजगी बसेसअत्यावश्यक सेवेसाठी  आपत्‍कालीन  सेवेसाठी तसेच या आदेशात नमूद केलल्‍या कारणांसाठी
6बांधकाम व उत्‍पादन क्षेत्र
6.1बांधकामाच्या ठिकाणी मजुरांना राहण्याची सोय असल्यास असे बांधकाम तसेच बांधकाम/ विकासकामांकरिता लागणारी सामग्री ने-आण करणेपूर्ण वेळ : 24 तास

नियमाचे भंग झाल्‍यास सदर व्‍यावसायिकास रु.10000/- दंड

6.2उत्पादन करणा-या उद्योग आस्थापना/कंपन्या/घटकपूर्ण वेळ : (24 तास)
7रेस्टॉरंट, बार, हॉटेल्स/ खाद्यपदार्थ विक्रेते
7.1रेस्टॉरंट, बार, हॉटेल्सकेवळ घरपोच सेवा (Home delivery) देण्यास परवानगी : सकाळी 7 ते रात्री 8.00 वाजेपर्यंत

 नियमाचे भंग केल्‍यास रु.1000/- दंड व संबंधीत आस्‍थापनेला रु.10000/- दंड

7.2रस्त्याच्या कडेला खाद्यपदार्थांची विक्री करणारे विक्रेतेफक्त पार्सल सुविधा व होम डिलीवरी सुविधा : सकाळी 7 ते रात्री 8.00 वाजेपर्यंत

नियमांचे उल्लंघन  करणा-यास रु.500/- दंड व संबंधीत विक्रेत्‍यास रु.500/- दंड व संबंधीत दुकान Covid-19 संपे पर्यंत बंद

8वृत्तपत्रे
8.1शासनमान्य यादीवरील वृत्तपत्रे, उपग्रह वाहिनीवरुन प्रसारित होणारे चॅनल्स, अधिस्वीकृतीधारक (Accreditation) पत्रकार (साप्ताहिक, Youtube Channel, Web Portal वगळून)पूर्ण वेळ : ( 24 तास )

 

8.2वितरणफक्त : सकाळी 7 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत
8.3छपाईपूर्ण वेळ : (24 तास )
9करमणूक व मनोरंजन
9.1चित्रपटगृहे, सिनेमा हॉल्स, नाट्यगृहे व सभागृहे, मनोरंजन केंद्रे (Amusement Parks) / Arcades/ व्हिडीओ गेम सेंटर्स, वॉटर पार्क्स (Water Parks), क्‍लबर्स् , जलतरण तलाव, व्यायामशाळा (Gyms) व स्पोर्ट कॉम्‍प्‍लेक्‍सबंद राहतील

 

9.2मोकळ्या जागावरील उपक्रम, मनोरंजन पार्क, प्रेक्षागृहे,बगीचे/उद्याने, सार्वजनिक मैदाने, खेळाची मैदाने, क्रिडांगणे, स्पोर्टस कॉम्प्लेक्स, योगा क्लासेस, जिम, व्यायामशाळा, जलतरण तलावबंद राहतील.
10धार्मिक/ सामाजिक बाबी
10.1धार्मिक स्थळे/प्रार्थनास्थळे (नियमित अर्चक यांना पूजा करण्याची सूट राहिल)बंद : फक्त पुजारी, इमाम, पाद्री, धर्मगुरु, भंते इ. नियमित पूजा अर्चा सुरु
10.2धार्मिक/सामाजिक/राजकीय/सांस्कृतिक कार्यक्रमबंद
10.3मुस्लीम बांधवाचा रमजानचा महिना लक्षात घेऊन दूध व फळे यांचेशी संबंधित दुकानेसकाळी 7 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत तसेच

सायंकाळी 5 ते 8.00 वाजेपर्यंत

10.4लग्न समारंभ 25 लोकांच्या उपस्थितीत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेची (../.पं./ग्रा.पं.) पूर्वपरवानगी घेऊनसंबंधित Incident Commander तथा तहसिलदार यांची परवानगी घेतली असल्यास. (सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत)
10.5अंत्यविधी कार्यक्रम केवळ 20 लोकांच्या उपस्थितीमध्येपूर्ण वेळ : 24 तास
11शाळा/ महाविद्यालय/कोचिंग
11.1शाळा, महाविद्यालयेबंद
11.2शाळा, महाविद्यालये केवळ इयत्ता 10 वी व 12 वी च्या परीक्षेकरीता विद्यार्थी व परीक्षेसंबंधित स्टाफ यांना परीक्षेकामी ये-जा करणेफक्त : सकाळी 7 ते रात्री 8.00 वाजेपर्यंत
11.3कोचिंग क्‍लासेस, खाजगी शिकवण्याबंद
11.4विद्यार्थ्यांना परीक्षेकरिता प्रत्यक्षपणे संबंधित केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित राहणे व तेथून घरी जाणेवैध प्रवेशपत्राचे आधारे परवानगी राहिल.
12इतर बाबी
12.1केशकर्तनालय/स्पा/सलुन/ब्युटी पार्लरबंद
12.2ऑक्‍सीजन उत्‍पादनपूर्ण वेळ सुरु
12.3-कॉमर्स (अत्यावश्यक सेवेकरिता)सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत (ओळखपत्र बाळगणे अनिवार्य)
12.4कोणत्याही सहकारी गृह निर्माण संस्थेत एका वेळी पाच कोरोना सकारात्मक अहवाल आलेल्या व्यक्ती आढळल्यास सदर सहकारी गृह निर्माण संस्था सुक्ष्म प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केले जाईल.अशा सुक्ष्‍म प्रतिबंधात्‍मक क्षेत्रामध्‍ये अभ्‍यागतांना प्रवेश बंद असेल.  नियमाचे भंग झाल्‍यास  रु.10000/- दंड
12.5घरगुती मदतनीस/वाहनचालक/स्वयंपाकीसंबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेची (../.पं./ग्रा.पं.) पूर्वपरवानगी घेऊन Incident Commander तथा तहसिलदार यांनी परवानगी दिल्यास सूट

Published by: sachin Salve
First published: April 17, 2021, 11:42 PM IST