'होय ती ऑडिओ क्लिप माझीच, पण..., ज्योती देवरेंनी अखेर दिलं स्पष्टीकरण

'होय ती ऑडिओ क्लिप माझीच, पण..., ज्योती देवरेंनी अखेर दिलं स्पष्टीकरण

Tehsildar Jyoti Deore audio case : 'व्हायरल झालेली क्लिप ही चुकीने झाली आहे. एक फोन आला होता, 2 तासात तुमच्या बाबतीत काही तरी घडणार आहे, त्यामुळे...'

  • Share this:

अहमदनगर, 23 ऑगस्ट : 'होय ती क्लिप माझीच. मी डिप्रेशनमध्ये गेले होते. मी या प्रकरणात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटले होते. आजही पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये एका महिलेचा मनोबल खच्चीकरण करण्यासाठी सगळे एकत्र आले याचं मला दुःख' असं म्हणत तहसीलदार ज्योती देवरे (Tehsildar Jyoti Deore) यांनी पहिल्यांदाच आपली भूमिका स्पष्ट केली.

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. ज्योती देवरे यांनी यावर आज मौन सोडले. व्हायरल झालेली क्लिप ही चुकीने झाली आहे. एक फोन आला होता, 2 तासात तुमच्या बाबतीत काही तरी घडणार आहे, त्यामुळे मी दुखी झाले आणि मला धक्का बसला, निगेटिव्ह विचार मनामध्ये आला. आणि त्यानंतर मनातल सर्व लिहिलं आणि कोरोनातील नेहेमीच्या सवयी प्रमाणे क्लिप तयार करायला घेतलं आणि रडायला आल्याचंही ज्योती देवरे यांनी सांगितलं.

राज्यात ऊन पावसाचा खेळ; मुंबईत वाढला पारा, या जिल्ह्यांत कोसळणार सरी

ज्योती देवरे यांनी वरिष्ठ अधिकारी आणि प्रशासनातील अधिकारी यांना भेटून सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची देखील भेट घेतल्याचं ज्योती देवरे सांगतात. त्याच बरोबर भावाच्या मित्राकडून क्लिप व्हायरल झाल्यानंतर मी डिप्रेशनमध्ये आले, त्यामुळे मी 2 दिवस कोणाशीच बोलले नसल्याचं ज्योती देवरे यांनी सांगितले.

Smartphone मधून फोटो काढतायेत? वाचा या सोप्या Tips, नक्की होईल फायदा

ज्या काही वाईट गोष्टी अवती भवती घडताना दिसतात ती क्लिप म्हणजे माझं भावनिक मानोगत होतं. त्या मनोगतात मला कोणाला ब्लेम नाही करायचं. मी त्या क्लिपमध्ये म्हणाले की, हे सगळे मनुचे अनुयायी आहेत. आपल्याला चुकीचं ठरवण्यासाठी सगळी पुरुष प्रधान व्यवस्था ही कशी एकत्र आली होती आणि एका महिलेला खच्चीकरण करण्यासाठी काय काय करत होती. नोकरी करत असताना काही उद्देश डोळ्यासमोर ठेऊन आलेलो असतो. कारण आपण आपला स्वाभिमान कधी गहाण ठेवणार नाही असंही ज्योती देवरा म्हणाल्या.

अहवालावर स्पष्टीकरण

ज्योती देवरे यांनी अहवालावर स्पष्टीकरण देताना म्हणाल्या की, वाळू लिलाव संदर्भात रेव्हेन्यू लॉस झाल्याचं म्हटलं आहे तर तो 100 ब्रासचा वाळू लिलाव होता. ज्यावेळी बोली लावली जात होती, तेव्हा प्रांताधिकारी यांचा फोन आला होता की, शासकीय कंत्राटदारांसाठी तो वाळू लिलाव तसाच ठेवा, त्यामुळे बोली लावू दिली नाही. संबंधित कॉन्ट्रॅक्टने तो घेतला. मात्र त्याचे पैसे भरले नाहीत त्यामुळे त्याला लिलाव दिला पण नाही आणि पुढे कारवाई पण झाली नाही. म्हणून रेव्हेन्यू लॉस झालं नसल्याचं ज्योती देवरे यांनी सांगितलं.

Published by: sachin Salve
First published: August 23, 2021, 5:48 PM IST
Tags:

ताज्या बातम्या