Home /News /ahmednagar /

शेपूट पकडून ओढले आणि पोटात मारली लाथ, बिबट्याच्या जबड्यातून पत्नीने पतीला वाचवले

शेपूट पकडून ओढले आणि पोटात मारली लाथ, बिबट्याच्या जबड्यातून पत्नीने पतीला वाचवले

बिबट्याने गोरख यांचे डोके आपल्या जबड्यात पकडले होते. त्यामुळे गोरख यांनी मोठमोठ्याने आरडाओरडा केला

बिबट्याने गोरख यांचे डोके आपल्या जबड्यात पकडले होते. त्यामुळे गोरख यांनी मोठमोठ्याने आरडाओरडा केला

बिबट्याने गोरख यांचे डोके आपल्या जबड्यात पकडले होते. त्यामुळे गोरख यांनी मोठमोठ्याने आरडाओरडा केला

अहमदनगर, 29 मार्च :  बिबट्याने जबड्यातील (leopard attack) आपल्या पतीचे डोके सोडविण्यासाठी जीवाचीही पर्वा न करता अक्षरश: बिबट्याला ठोसे लगावून शेपूट आणि पाय ओढून पत्नीने पतीचा जीव वाचवल्याची थरारक घटना अहमदनगरच्या (ahamadnagar) पारनेर तालुक्यात घडली आहे. या महिलेच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील दरोडी चापळदरा इथं ही घटना घडली. संजना पावडे (sanjana pavade) असं या धाडसी पत्नीचे नाव आहे. गोरख पावडे असं बिबट्याने हल्ला केलेल्या पतीचे नाव आहे. पारनेर तालुक्यातील डोंगराच्या कुशीत  असणाऱ्या दरोडी चापळदरा भागात पावडे कुटुंब वास्तव्यास आहे. मध्यरात्रीची दोनच्या सुमारास जनावरांच्या गोठ्यात आवाज येत असल्याने गोरख हे पाहण्यासाठी गोठ्यात गेले. त्याचवेळी बिबट्याने गोरख यांच्यावर हल्ला केला. ('माझ्या पाठीमागे वाईट बोलणारे जे आहेत..त्यांना आरसा' अमेय वाघची पोस्ट चर्चेत) बिबट्याने गोरख यांचे डोके आपल्या जबड्यात पकडले होते. त्यामुळे गोरख यांनी मोठमोठ्याने आरडाओरडा केला. तो आवाज ऐकून त्यांची पत्नी संजना यांनी गोठ्याकडे धाव घेतली आणि समोरचे दृश्य पाहून त्यांना एकच हादरा बसला. पण, पतीची अवस्था पाहून संजना यांनी कसलाही विचार न करता बिबट्याच्या शेपटीला धरून त्याला मागे खेचले. एका हाताने पाय धरला तर दुसऱ्या हाताने पोटात मारले. त्यातच आपल्या मालकावर हल्ला झाल्याचे पाहात त्यांच्या पाळीव कुत्र्याने मालकाला वाचवण्यासाठी बिबट्याच्या गळ्याचा चावा घेतला. गोरख पावडे यांचे वडील दशरथ यांनी दगडाने बिबट्याचा प्रतिकार केला. त्यामुळे आपलीच शिकार होते की काय असं वाटू लागल्याने बिबट्याने तेथून धूम ठोकली. (कोण आहे मोहसिन खान ? जो 140+ किमी दर ताशी वेगाने गोलंदाजी करु शकतो) बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेले गोरख यांना शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती आता उत्तम आहे. बिबट्याच्या जबड्यातून पतीला सुखरूप वाचवल्याबद्दल संजना यांचं गावात कौतुक होत आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या