Home /News /ahmednagar /

शरद पवारांचा नातू म्हणून वेगळा न्याय का? दरेकरांचा सवाल

शरद पवारांचा नातू म्हणून वेगळा न्याय का? दरेकरांचा सवाल

Pravin Darekar on Rohit Pawar: रोहित पवारांनी कोविड सेंटरमध्ये डान्स करणं हे निषेधार्ह असल्याचं प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे.

मुंबई, 25 मे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी कर्जत तालुक्यातील गायकरवाडी येथील कोविड सेंटरला (Covid Center) भेट दिली. यावेळी आमदार रोहित पवारांनी पीपीई किट घातलेला नव्हता आणि त्याचसोबत त्यांनी रुग्णांसोबत डान्सही केला. रोहित पवारांनी केलेल्या डा डान्सचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला आणि त्यानंतर त्यावर विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या. भाजपने (BJP) आता रोहित पवारांच्या या कृत्यावर आक्षेप घेत थेट सवाल उपस्थित केला आहे. पवारांचा नातू म्हणून वेगळ न्याय का? विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी म्हटलं, रोहित पवार यांनी एका कोविड सेंटरवर जाऊन कोविड प्रोटोकॉलचा भंग केला हे निषेधार्ह आहे. त्या ठिकाणी ते पीपीई किट न घालता गेले, रुग्णांमध्ये मिसळले आणि डान्स केला. त्यामुळे ते सुपर स्प्रेडर ठरू शकतात. सर्व सामान्य नागरिकांना एक न्याय आणि शरद पवारांचे (Sharad Pawar) नातू म्हणून रोहित पवारांना दुसरा न्याय का? असा सवालही दरेकरांनी उपस्थित केला. 'झिंग झिंग झिंगाट'वर रोहित पवारांनी धरला ताल; कोविड सेंटरमध्ये लहानग्यांपासून ते आजींपर्यंत सर्वांसोबत तुफान डान्स, Video Viral जे चूक ते चुकच प्रविण दरेकर यांनी म्हटलं, पाचवी नापास झालेल्या गुजरातमधील आमदारांसारखे आपण इंजेक्शन दिले नसेलही, पण कोविड नियमांचे केलेले उल्लंघन ही त्याच तोडीची गंबीर बाब आहे. नियम उल्लंघनाबाबत आमच्या पक्षातील असो व अन्य, मी त्यावेळी माझी भूमिका मांडली, समर्थन केले नाही. गुजरातमधील आमदारांकडे बोट करताना अनेक मंत्री खुलेआम प्रोटोकॉलचे उल्लंघन करत होते. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत होते. लग्न समारंभांना उपस्थित राहत होते. बारामतीत पाणी भरून इंजेक्शन विकली जात होती, काँग्रेसचे तर मेळावे होत होते, त्याबद्दल आपण भूमिका मांडल्याचे आठवत नाही. जे चूक, ते चुकच असते मग तो कोणीही असो. दुसऱ्याकडे बोट दाखवत असताना आपल्याकडे चार बोटे असतात, एवढेच रोहित जी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Coronavirus, Pravin darekar, Rohit pawar

पुढील बातम्या