मराठी बातम्या /बातम्या /ahmednagar /

घराचे खोदकाम करताना सापडला नाण्यांनी भरलेला हंडा, गावात एकच चर्चा आणि...

घराचे खोदकाम करताना सापडला नाण्यांनी भरलेला हंडा, गावात एकच चर्चा आणि...

 सोन्यानं भरलेला भला मोठा हंडा मिळून आल्याची अफवा गावात पसरली होती.

सोन्यानं भरलेला भला मोठा हंडा मिळून आल्याची अफवा गावात पसरली होती.

सोन्यानं भरलेला भला मोठा हंडा मिळून आल्याची अफवा गावात पसरली होती.

श्रीरामपूर, 15 जुलै : अहमदनगर (ahmednagar) जिल्ह्यातील श्रीरामपूर (shrirampur) तालुक्यात गुप्तधन सापडले आहे. घराचे खोदकाम करत असताना हंडाभर चांदीच नाणे सापडल्याची आश्चर्यजनक घटना घडली आहे. कौतुकास्पद म्हणजे,  राजेश खटोड या व्यक्तीने ही नाणी सरकारजमा केली आहेत. श्रीरामपूर तालुक्यातील बेलापुर येथील व्यापारी राजेश खटोड यांच्या घराचे खोदकाम सुरू होते. अचानक एक जड वस्तू हाताला लागली. माती बाजूला सारून पाहिले असता एक भलामोठा हंडा आढळून आला. हंडा उघडून पाहिला असता सर्वांना सुखद धक्का बसला. Corona Third Wave : अखेर कोरोनाची तिसरी लाट आलीच; WHO ने केलं अलर्ट या हंड्यात चांदीची 11 किलो वजनाची 1020 नाणी (silver coin) सापडली आहेत. या नाण्यांची आजच्या बाजार भावानुसार 8 लाख रुपये किंमत आहे. राजेश खटोड यांच्या आजोबांनी हा हंडा तिथे ठेवल्याचं त्यांना सांगितल होतं. त्यामुळे खोदकाम करत असताना शोध घेतला असता हा हंडा त्यांना सापडला. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांना खटोड यांनी याबाबत माहिती दिल्यानंतर तहसीलदार प्रशांत पाटील यांनी पंचनामा करुन हा चांदीचे नाणे भरलेला हंडा ताब्यात घेतला आहे. गावात गुप्तधन सापडल्याची चर्चा काही दिवसापासून सुरू होती. हंडाभर सोने भरलेला भला मोठा हंडा मिळून आल्याची अफवा गावात पसरली होती. Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत आजही तेजी तर चांदीलाही झळाळी; वाचा आजचे दर त्यानंतर बेलापूर येथील राजेश खंटोड यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे रितसर अर्ज केला आणि नियमानुसार ताब्यात घेण्याची विनंती केली होती. त्यांना 11 किलो 6 ग्राम चांदी मिळुन आली त्यात चार आणे किंमतीची 46 नाणी होती. आठ आणे किंमतीची 58 नाणी तर दोन अरबी नाणी व एक रुपये किंमतीची 914 नाणी अशी एकूण 1020 नाणी आढळून आली आहे.
First published:

Tags: Gold

पुढील बातम्या