मराठी बातम्या /बातम्या /ahmednagar /

विकएंड प्लॅन करत असाल तर हे वाचा, निसर्ग तर फुललाय पण....

विकएंड प्लॅन करत असाल तर हे वाचा, निसर्ग तर फुललाय पण....

अहमदनगर जिल्ह्यातील कळसूबाई आणि हरिश्चंद्रगड या परिसरातील पर्यटन शनिवार आणि रविवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विकएंडला पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्याचं लक्षात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

अहमदनगर, 2 जुलै : कोरोनाची (Corona) दुसरी लाट (Second Wave) ओसरत असताना अनेकजण पावसाळी पर्यटनाला (Trip) बाहेर पडण्याचे प्लॅन (weekend plans) करत आहेत. विशेषतः शनिवार आणि रविवारच्या (Saturday and Sunday) सुट्टीचा फायदा घेत जवळपासच्या निसर्गरम्य ठिकाणी जाऊन पावसाचा आनंद घेऊन यावा, असा बेत अनेक कुटुंबं सध्या आखत आहेत. मात्र सध्या महाराष्ट्राच्या काही भागात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे काही पर्यटनस्थळं (tourist spots closed) बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कळसूबाई आणि हरिश्चंद्रगड या परिसरातील पर्यटन शनिवार आणि रविवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विकएंडला पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्याचं लक्षात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासन यांनी घेतलेल्या बैठकीत कोरोनाचं संक्रमण वाढण्याची शक्यता हाणून पाडण्यासाठी शनिवार आणि रविवारी पर्यटन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन करणाऱ्यांना आपला बेत एकतर रद्द करावा लागणार आहे किंवा बदलावा लागणार आहे. गेल्या काही विकेंडना मोठी गर्दी अहमदनगर जिल्ह्यातील कळसुबाई हे राज्यातील सर्वात उंच शिखर आहे. विस्तीर्ण कोकणकडा, आश्चर्यकारक सांदण व्हॅली, रतनगड, हरिश्चंद्रगड आणि जागोजागचे नयनरम्य धबधबे पाहण्यासाठी राज्यभरातील पर्यटक या ठिकाणी येत असतात. मात्र विकेंडला हे प्रमाण अधिकच वाढत असून त्यामुळे कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता बळावत असल्याचं लक्षात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. हे वाचा - स्टार्टअपसाठी जगातील सर्वोत्तम शहरांत मुंबईची कमाल;1000 शहरांत औरंगाबादचाही डंका जान सलामत तो विकेंड पचास सध्या पावसामुळे निसर्ग चांगलाच बहरला आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात हिरवाई फुलली असून कोरोना काळात गेले दीड वर्ष लॉकडाऊनचा सामना करणाऱ्या सामान्यांची पावलं बाहेर पडण्यासाठी आसुसली आहेत. मात्र अजूनही कोरोनाचा धोका कायम असून गर्दी केल्यास कोरोनाचा फैलाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आठवड्यातील एखाद्या दिवशी या स्थळांना भेट द्यावी आणि विकेंडला एकत्रित गर्दी करू नये, असं आवाहन प्रशासनाकडून पर्यटकांना वेळोवेळी केलं जात आहे.
First published:

Tags: Ahmednagar, Coronavirus, Tour

पुढील बातम्या