Home /News /ahmednagar /

अहमदनगरमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या, आधी मुलीला लावला गळफास, मग पती-पत्नीनं संपवलं जीवन

अहमदनगरमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या, आधी मुलीला लावला गळफास, मग पती-पत्नीनं संपवलं जीवन

अहमदनगर (Ahmednagar) जिल्हा एकाच कुटुंबातील तिघांच्या आत्महत्येनं हादरुन गेलं आहे.

    अहमदनगर, 06 सप्टेंबर: अहमदनगर (Ahmednagar) जिल्हा एकाच कुटुंबातील तिघांच्या आत्महत्येनं हादरुन गेलं आहे. केडगाव येथील एकाच कुटुंबातील तिघांनी गळफास लावून घेत आत्महत्या (Suicide) केली आहे. एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह आढळून आल्यानं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळी केडगाव देवी रोडवरील अथर्व नगर येथे ही घटना घडली. समोर आलेल्या प्राथमिक चौकशीतून समोर आलं आहे की, आर्थिक विवंचेनेतून ही आत्महत्या करण्यात आली आहे. Belgaum Election result: बेळगाव महापालिकेत भाजपची हवा, स्पष्ट बहुमत मृतांमध्ये आई-वडिलांसह 10 वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. आधी मुलीला गळफास देऊन नंतर पती-पत्नीने गळफास लावून घेतल्याचा अंदाज लावण्यात आला आहे. संदीप दिनकर फाटक (वय 40) किरण संदीप फाटक (वय32) व मैथिली संदीप फाटक (वय 10) अशी मृतांची नावं आहे. मृत केडगावमधील मोहिनीनगर भागात राहत असून संदीप हे व्यावसायिक होते. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून त्यांना चिठ्ठीही सापडली आहे. अधिक तपास सुरु आहे. सदर घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक राकेश मानगावकर हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाही सुरू केली आहे. तसंच शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Ahmednagar, Ahmednagar News, Suicide case

    पुढील बातम्या