मराठी बातम्या /बातम्या /ahmednagar /

अश्लील फोटो काढून बदनामीची धमकी; नगरमध्ये महाविद्यालयीन तरुणीवर महिनाभर अत्याचार

अश्लील फोटो काढून बदनामीची धमकी; नगरमध्ये महाविद्यालयीन तरुणीवर महिनाभर अत्याचार

Rape in Ahmednagar: महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या तरुणीचे (College student) आक्षेपार्ह फोटो (Offensive photo) काढून तिला बदनामीची धमकी (Threat) देत आरोपीनं तिच्यावर महिनाभर अत्याचार (Rape) केल्याची घटना उघडकीस आली आहे.

    अहमदनगर, 29 जून: महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या तरुणीचे (College student) आक्षेपार्ह फोटो (Offensive photo) काढून तिला बदनामीची धमकी (Threat) देत आरोपीनं तिच्यावर महिनाभर अत्याचार (Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लैंगिक शोषण करूनंही आरोपीचं भागलं नाही. त्यामुळे त्यानं पीडितेला पुन्हा बदनामीची धमकी देत तिच्याकडून पैशाची (Demand money) मागणी केली. घाबरलेल्या तरुणीनं आपल्याजवळी आठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आरोपीला दिले. तरीही आरोपीचा त्रास कमी झाला नाही. त्यामुळे आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेनं अहमदनगरमधील तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे. सोहेल अख्तर सय्यद असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव असून तो अहमदनगरमधील मुकुंदनगर येथील रहिवासी आहे. पीडित तरुणी आणि आरोपी एकाच महाविद्यालयात शिक्षण घेतात. दरम्यानच्या काळात आरोपीनं पीडितेशी मैत्री करून तिच्यासोबत आक्षेपार्ह फोटो काढले. यानंतर हे फोटोज व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीनं पीडितेवर वारंवार बलात्कार केला आहे. आरोपीनं 19 मे ते 17 जून दरम्यान महिनाभर तरुणीवर अनेकवेळा अत्याचार केला आहे. आरोपीनं पीडितेवर सोलापूर रोडवरील लॉज आणि चांदबीबी महाल परिसरात अनेकदा बलात्कार केला आहे. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्यानं आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत, पीडितेकडं पैशाची मागणी केली. यामुळे पीडितनं आपल्याजवळील 8 ग्रॅम सोन्याचे दागिने आरोपीला दिले. यानंतरही आरोपीचा त्रास कमी झाला नाही. हेही वाचा-पुण्यात तरुणाचा मैत्रिणीवर बलात्कार; अश्लील VIDEO शाळेच्या ग्रुपवर केला व्हायरल आरोपीनं पीडितेचं लैंगिक शोषण आणि त्रास सुरूच ठेवला. यानंतर आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेनं अहमदनगरमधील तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी बलात्कार, धमकी आणि अन्य कलमांतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा तपास तोफखाना पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ahmednagar, Crime news, Rape

    पुढील बातम्या