Home /News /ahmednagar /

चोरटे लुटण्यासाठी पळत आले अन् व्यापाऱ्याने बॅग फेकली भिंतीपलीकडे, LIVE VIDEO

चोरटे लुटण्यासाठी पळत आले अन् व्यापाऱ्याने बॅग फेकली भिंतीपलीकडे, LIVE VIDEO

चोरट्यांनी यावेळी डोळ्यात मिरचीची पूड टाकून आणि हत्याराने मारहाण करुन त्याच्या हातातील पैशांची बॅग पळविण्याचा प्रयत्न केला होता.

अहमदनगर, 14 फेब्रुवारी :  अहमगदनगरमधून (Ahmednagar ) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दुकानातून घरी आल्यानंतर कारमधून बाहेर पडत असताना चोरट्यांनी (Thieves ) मिरचीची पूड टाकून लुटण्याचा प्रयत्न केला. पण, वेळीच व्यापाऱ्याने हातातील पैशाची बॅग भिंतीच्या पलीकडे फेकून दिली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (cctv video) कैद झाला आहे. अहमदनगरमधील नागापूर परिसरातील आदर्शनगरमधील गुरुकृपा कॉलनीत ही घटना घडली आहे. गुरुकृपा कॉलनीत राहणारे व्यापारी संदीप नागरगोजे (sandeep nagargoje) हे नेहमीप्रमाणे काम करून आपल्या कारने घरी परतले होते. दारासमोर त्यांनी कार लावली आणि बाहेर पडले होते. पण, त्याचवेळी दबा धरून बसलेले चोरटे कारने पाठीमागून आले. कारमधून उतरून चोरट्यांनी संदीप नागरगोजे यांच्याकडे धाव घेतली. चोरटे आपल्याकडे येत असल्याचे पाहून संदीप नागरगोजे सतर्क झाले. त्यांनी हातातील बॅग कपाऊंडला लागून असलेल्या भींतीच्या पलीकडे फेकून दिली. चोरट्यांनीही त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली. त्याचवेळी घरातील एक महिला बाहेर आली आणि तीनेही चोरांवर दगडं फेकण्यास सुरूवात केली. त्यामुळे चोरटे आले तसे कारमध्ये पळून गेले. चोरट्यांनी यावेळी डोळ्यात मिरचीची पूड टाकून आणि हत्याराने मारहाण करुन त्याच्या हातातील पैशांची बॅग पळविण्याचा प्रयत्न केला होता.  ही संपूर्ण थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेनंतर संदीप नागरगोजे यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या