Home /News /ahmednagar /

मोठी बातमी, तहसीलदार ज्योती देवरेंची जळगावला बदली

मोठी बातमी, तहसीलदार ज्योती देवरेंची जळगावला बदली

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी आत्महत्या करण्याचा इशारा देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर तो राज्यभर चर्चेचा विषय ठरला होता.

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी आत्महत्या करण्याचा इशारा देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर तो राज्यभर चर्चेचा विषय ठरला होता.

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी आत्महत्या करण्याचा इशारा देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर तो राज्यभर चर्चेचा विषय ठरला होता.

अहमदनगर, 13 सप्टेंबर : अहमदनगर (ahmednagar)  जिल्ह्यातील पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे (Tehsildar Jyoti Deore) ऑडीओ क्लिपमुळे चर्चेत आल्या होत्या. पण आता ज्योती देवरे यांची बदली करण्यात आली आहे. त्यामुळे नगरमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी आत्महत्या करण्याचा इशारा देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर तो राज्यभर चर्चेचा विषय ठरला होता. या प्रकरणानंतर अखेर ज्योती देवरे यांची जळगाव येथे संजय गांधी निराधार योजनेत बदली झाली आहे. लग्नातच नवरीबाईला 'जोर का झटका'! नवरदेवाचं 'ते' कृत्य पाहून उडालीच; VIDEO VIRAL विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी ज्योती देवरे यांच्याविरुद्ध लोकायुक्त मुंबई यांच्याकडे भ्रष्टाचाराची तक्रार दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती अँड. असीम सरोदे यांनी दिली.  तक्रारदार राहुल झावरे यांच्यामार्फत देवरे यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. वाळूचे ठेके व दंड सरकारकडे जमा न केल्याचा ठपका देवरे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. लोकायुक्त नियुक्त झाल्यानंतर ही पहिली तक्रार दाखल झाली आहे. विशेष म्हणजे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या पारनेर तालुक्यातच ही तक्रार दाखल झाली आहे. देवरे यांनी प्रांताच्या अधिकार वापरल्याचा आरोप ही करण्यात आला आहे. सुमारे चार हजार पायऱ्यांचा ‘स्वर्गात’ जाणारा जिना; आता सरकार करणार नष्ट, पण का? या प्रकरणामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. पर्यावरणाची हानी झाली आहे असून याला जबाबदार देवरे आहेत. त्या दोषी असतील तर लोकायुक्त त्यांना चौकशीसाठी बोलवतील, या प्रकरणाची  निःपक्षपाती चौकशी करावी. देवरे यांनी तहसीलदार पदाचा धुळे येथे गैरवापर केला आहे.  पण दंड न आकारताच वाळूच्या गाड्या का सोडल्या? असा सवाल अँड. असीम सरोदे यांनी उपस्थितीत केला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी ज्योती देवरे यांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशी अहवाल अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी 6 ऑगस्टला तयार करून नाशिकच्या विभागीय आयुक्तांना पाठविला होता. या अहवालामुळे ज्योती देवरे यांनी ही ऑडिओ क्लिप व्हायरल केल्याचं बोललं जात आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या