Home /News /ahmednagar /

आत्महत्या केलेल्या ST कर्मचाऱ्याच्या मुलासोबत घडला अनर्थ, मित्रासोबत जाताना काळानं घातली झडप

आत्महत्या केलेल्या ST कर्मचाऱ्याच्या मुलासोबत घडला अनर्थ, मित्रासोबत जाताना काळानं घातली झडप

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Accident in Ahmednagar: अहमदनगर शहरातील एका एसटी कर्मचाऱ्याने देखील संगमनेर बसस्थानकात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या आत्महत्या करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्याच्या मुलासोबत देखील मोठा अनर्थ घडला आहे.

    अहमदनगर, 30 मार्च: गेल्या काही काळापासून महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST employee strike) सुरू आहे. आपल्या मागण्या मान्य होत नसल्याच्या कारणातून अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं आहे. काही दिवसांपूर्वी अहमदनगर शहरातील एका एसटी कर्मचाऱ्याने देखील संगमनेर बसस्थानकात गळफास घेऊन आत्महत्या (ST employee suicide) केली होती. या आत्महत्या करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्याच्या मुलासोबत देखील मोठा अनर्थ घडला आहे. मित्रासोबत दुचाकीने जात असताना दोघांवर काळाने झडप घातली आहे. वडिलांनंतर मुलाचा अपघाती मृत्यू (Death in road accident) झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव सुभाष तेलोरे (वय- 19) आणि बाळकृष्ण श्रीकांत तेलोरे (वय- 22) हे दोघं मंगळवारी दुपारी दुचाकीने नगर मनमाड रस्त्याने जात होते. दरम्यान नगर शहरातील पत्रकार चौकातून जाताना त्यांच्या दुचाकीला एका भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली आहे. हा अपघात इतका भीषण होता की दोघांचाही जागीच चिरडून मृत्यू झाला आहे. भरदुपारी अपघाताची ही घटना घडल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. हेही वाचा-Video : टिटवाळ्यात घरासमोर खेळत असलेल्या दीड वर्षांच्या मुलाला टॅम्पोने चिरडलं यातील मृत उद्धव तेलोरे याचे वडील सुभाष तेलोरे एसटी महामंडळात काम करत होते. सप्टेंबर महिन्यांत त्यांनी संगमनेर बसस्थानक परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. वडिलांच्या आत्महत्येनंतर मुलाचा अशाप्रकारे अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर दोन जीवलग मित्रांचा अशाप्रकारे अपघाती मृत्यू झाल्याने गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. हेही वाचा- एक आघात आणि कुटुंब विखुरलं; जवानाच्या आत्महत्येनंतर बायकोनं स्वत:ला पेटवलं, तर भावाला... मृत उद्धव आणि बाळकृष्ण दोघंही चांगले मित्र असून पाथर्डी येथील एका महाविद्यालयात शिकत होते. घटनेच्या दिवशी मंगळवारी दुपारी हा अपघात घडला आहे. दोघंही नगर मनमाड रस्त्याने सावेडीकडून पाथर्डीच्या दिशेनं जात होते. दरम्यान पत्रकार चौकातून जाताना एका अवजड वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली आहे. विशेष म्हणजे दिवसा नगर शहरातून अवजड वाहतुकीला बंदी आहे. असं असूनही हा ट्रक भरधाव वेगाने नगर शहरातून जात होता.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Accident, Ahmednagar

    पुढील बातम्या