Home /News /ahmednagar /

उसाला आग लावून उचललं टोकाचं पाऊल; 70 वर्षीय शेतकऱ्याच्या आत्महत्येनं अहमदनगर हादरलं

उसाला आग लावून उचललं टोकाचं पाऊल; 70 वर्षीय शेतकऱ्याच्या आत्महत्येनं अहमदनगर हादरलं

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

ऊसतोड अभावी एका शेतकऱ्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दवी घटना समोर आली आहे. ही घटना शेवगाव तालुक्यातील जोहरापूर येथे घडली. (farmer suicide in johrapur shevgaon) जनार्धन सिताराम माने असे 70 वर्षीय आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

पुढे वाचा ...
अहमदनगर, 7  एप्रिल : ऊसतोड अभावी एका शेतकऱ्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दवी घटना समोर आली आहे. ही घटना शेवगाव तालुक्यातील जोहरापूर येथे घडली. (farmer suicide in johrapur shevgaon) जनार्धन सिताराम माने असे 70 वर्षीय आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ऊसतोड मिळत नसल्याने या शेतकऱ्याने अगोदर ऊसाला आग लावली व नंतर विष पित आत्महत्या केली. या घटनेने खळबळ उडाली आहे. तसेच अतिरिक्त ऊसाचा प्रश्न ऐरणीवर आल्याने शेतकऱ्यांमध्ये साखर कारखान्यांच्या विरोधात संताप निर्माण झाला आहे. आधी लावली उसाला आग, मग... शेवगाव तालुक्यातील जोहरापूर येथील जनार्धन सिताराम माने (वय ७०) या वृद्ध शेतकऱ्याने चकरा मारूनही आपल्या ऊसाला तोड मिळत नसल्याने मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास स्वत:च्या हाताने ऊसाला आग लावली. तसेच नैराश्यातून ऊसाच्या फडात विषारी औषध घेतले. त्यांना उपचारार्थ शहरातील नित्यसेवा रुग्णालयात दाखल केले असता बुधवारी ६ एप्रिलला उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने शेतकऱ्यांना ऊसतोडीसाठी चरखात पिळल्यासारखे पिळून घेणाऱ्या साखर कारखान्यांबाबत चिड निर्माण झाली आहे. मुलाने दिला हा जबाब - मृत जनार्धन माने हे खामगाव शिवारात गट नं. ९ मध्ये उभा असणाऱ्या आपल्या पावणे तीन एकर ऊसाला तोड मिळावी यासाठी महिन्यापासुन कार्यक्षेत्रातील कारखान्याकडे चकरा मारीत होते. पंरतु त्यांना फक्त पुढची तारीख दिली जात होती. गयावया करुनही ऊसतोड लाबंत चालल्याने गाळपाअभावी ऊस उभाच राहतो की काय या नैराश्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा जबाब मृत शेतकरी यांचा मुलगा संतोष जनार्धन माने यांनी पोलिसांना दिल्याची माहिती आहे. दरम्यान, याप्रकरणी बाबत पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे . शेवगाव तालुका कार्यक्षेत्रात चार ऊस कारखाने असुनही कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यास ऊसतोड अभावी आत्महत्या करावी लागली ही मोठी शोकांतिक झाली आहे. यामुळे अतिरिक्त ऊसाचा प्रश्न आता ऐरणीवर येत आहे.
Published by:News18 Desk
First published:

Tags: Farmer, Sugarcane farmer, Suicide news

पुढील बातम्या