मराठी बातम्या /बातम्या /ahmednagar /

Mothers Day : सुधामाँ..., 80 मातांच्या 'आई'ची डोळ्यात पाणी आणणारी गोष्ट!

Mothers Day : सुधामाँ..., 80 मातांच्या 'आई'ची डोळ्यात पाणी आणणारी गोष्ट!

'हे आपलं घर असून आम्ही निमित्त मात्र आहोत. येथे आलेल्या आई वडिलांची सेवा साईबाबा करवून घेतात. मी दररोज सर्वांना अम्मा म्हणून बोलते'

'हे आपलं घर असून आम्ही निमित्त मात्र आहोत. येथे आलेल्या आई वडिलांची सेवा साईबाबा करवून घेतात. मी दररोज सर्वांना अम्मा म्हणून बोलते'

'हे आपलं घर असून आम्ही निमित्त मात्र आहोत. येथे आलेल्या आई वडिलांची सेवा साईबाबा करवून घेतात. मी दररोज सर्वांना अम्मा म्हणून बोलते

  • Published by:  sachin Salve

सुनिल दवंगे, प्रतिनिधी

शिर्डी, 08 मे : मातृदिनाचं औचित्य साधत आज देशभर आपल्या जन्मदातीचा फोटो मुला-मुलींनी मोबाईल स्टेटसला ठेवला आहे. मात्र साईबाबांच्या शिर्डीत बेघर झालेल्या 80 मातांच्या मुलीनं अनोखा पद्धतीने मातृदिवस साजरा करत आपलं मुलीचं कर्तव्य पार पाडले.

विजयवाडा येथील सुधा-श्रीनिवास या दाम्पत्याने 16 वर्षांपुर्वी शिर्डीत व्दारकामाई वृद्धाश्रम (dwarkamai old age home shirdi) सुरू केला. साईभक्तांच्या देणगीवर चालणाऱ्या वृद्धा आश्रमात सुधा ही जवळपास 80 मातांचा सांभाळ करत आहे. आई-वडिलाविना पोरकी असणारी सुधा आपला पती श्रीनिवाससोबत हा वृद्धाश्रम चालवते. वृद्ध महिलांच्या सकाळच्या सर्व दिनचर्या सुधा स्वतः करते. शौचालयापासून ते भोजन, औषध, असे सर्व काही मुलगी बनलेली ती करते.

आज मातृदिना निमित्तानं वृद्धाश्रम मध्ये सर्व वयोवृद्ध मातांसमवेत केक कापून एकमेकींना भरवण्यात आला. आलेला दिवस आनंदाने जगणे यावर आधिक भर दिला जातो. सुधाचं सध्याचं वय 42 वर्ष आहे. दोन मुलांना जन्म देखील त्यांनी याच वृद्धाश्रमात दिला. यावेळी बोलत असताना सुधा भावुक झाल्या.

(संतापजनक, पोलीस कॉन्स्टेबलचा नात्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार)

'हे आपलं घर असून आम्ही निमित्त मात्र आहोत. येथे आलेल्या आई वडिलांची सेवा साईबाबा करवून घेतात. मी दररोज सर्वांना अम्मा म्हणून बोलते तसेच त्या देखिल माझ्यापेक्षा वयानं दुप्पट असून ही मला सुधामाँ म्हणून हाक मारतात. मी त्यांची मुलगी आहे मात्र त्या मला आपला आई मानतात. मी पोरकी आहे पण मला देवानं 80 आई आणि 30 वडील दिले आहेत. साफ सफाईला कामगार मिळत नाही. तेव्हा स्वतः करावे लागते. त्यात मला काही किळस वाटत नाही कारण साईबाबांचा वसा आम्ही चालवण्याचा प्रयत्न करत आहे' असं सुधा यांनी सांगितलं.

('उद्धव ठाकरे दम असेल तर लोकांमध्ये या', नवनीत राणा आक्रमक, BMC निवडणुकीत उतरणार)

वृद्धाश्रमामध्ये आजमितीला 83 वयोवद्ध महिला आहेत. ज्यांचे वय 70 वर्षे पेक्षा अधिक आहे. काहींना दहा वर्षे तर काहींना पंधरा वर्षे येथे झाली आहे. घरातून रस्त्यावर आलेल्या वयोवृद्धांना व्दारकामाई हक्काच छत बनलं आहे. ज्यात ह्या माता मोठ्या आनंदानं राहतात. मुळात वृद्धाश्रम ही संकल्पनाच बंद होणे अपेक्षित आहे. मात्र आज ही अनेक रक्ताच्या नात्याची मुलं आपल्या आई वडिलांना बेघर करतात. अशाच बेघर कुठलंही नातं नसलेली सुधा त्यांची मुलगी बनून मोठ्या श्रद्धेन सांभाळ करते. आपुलकीनं त्यांंच हवे नको पाहते. आज मातृदिना निमित्तानं सुधामाँ च्या कर्तृत्वाला सलाम आहे.

First published: