मराठी बातम्या /बातम्या /ahmednagar /

....म्हणून राज ठाकरे चंद्रकांत पाटलांना भेटले असतील, रोहित पवारांचा टोला

....म्हणून राज ठाकरे चंद्रकांत पाटलांना भेटले असतील, रोहित पवारांचा टोला

'मराठा, OBC या संवेदनशील विषयावर राजकारण करू नका. असं केलं तर आयुष्यात कधीच सत्ता मिळणार नाही'

'मराठा, OBC या संवेदनशील विषयावर राजकारण करू नका. असं केलं तर आयुष्यात कधीच सत्ता मिळणार नाही'

'मराठा, OBC या संवेदनशील विषयावर राजकारण करू नका. असं केलं तर आयुष्यात कधीच सत्ता मिळणार नाही'

अहमदनगर, 18 जुलै : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackery) हे नाशिक दौऱ्यावर असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय तर्कवितर्क लढवले जात होते. पण, 'चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे एकाच गावात असल्यामुळे भेटले असतील' असा खोचक टोला राष्ट्रवादीचे (ncp) आमदार रोहित पवार (rohit pawar) यांनी लगावला.

अहमदनगरच्या पाथर्डी येथे कोरोना काळात काम करणाऱ्या डॉक्टर आणि कोरोना सेंटरमध्ये काम करणाऱ्यांचा स्वयंसेवकांचा आमदार रोहित पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. हिंद सेवा मंडळाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा सन्मान करण्यात आला. यावेळी बोलत असताना रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटलांवर टीकास्त्र सोडलं.

Territorial Army Recruitment 2021: प्रादेशिक सेनेत होणार मोठी पदभरती

'भाजपच्या नेत्यांना राजकीय वक्तव्य करायला आवडत आहेत. महाराष्ट्रातील अनेक नेत्यांवर ED ची कारवाई करावी यासाठी चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली होती. त्यात भाजपचे पदाधिकारी होते.  पण त्यांनी   OBC आणि मराठा आरक्षणासाठी केंद्राला पत्र का लिहिले नाही? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थितीत केला.

तसंच, 'चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे एकाच गावात असल्यामुळे भेटले असतील. राजकारणा पलीकडे संबंध असतात. मराठा OBC या संवेदनशील विषयावर राजकारण करू नका. असं केलंत तर आयुष्यात कधीच सत्ता मिळणार नाही आणि जे विषय केंद्र सरकारकडे आहेत त्यावर राजकारण करू नका, असं राज ठाकरे यांनी चंद्रकांत दादांना म्हटलं असेल' असा टोलाही रोहित पवारांनी चंद्रकांत पाटलांना लगावला.

MIM चे ट्विटर अकाऊंट हॅक, लावला एलॉन मस्क यांचा फोटो, हॅकर्सच्या हेतूविषयी चर्चा

तसंच, 'ग्रामीण भागात कोरोना रुग्णावर उपचार आणि सेवा करणारे अनेक हात गेल्या दोन वर्षांपासून कार्यरत आहेत. कोरोना सेंटरच्या माध्यमातून शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील हजारावर रुग्णांवर विनामूल्य सेवा देऊन कोरोना रुग्णांना दिलासा देण्याचं काम या डॉक्टर आणि समाजसेवकांनी केलं आहे. याबद्दल त्यांचा सन्मान व्हावा यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सध्या कोरोना रुग्णसंख्या कमी होत असली तरी कोरोनाबाबत काम थांबलेलं नाही, सर्वांनी कोरोनाच्या  नियमांचे पालन करावे, असं आवाहनही यावेळी रोहित पवार यांनी केली.

First published:

Tags: Rohit pawar