मराठी बातम्या /बातम्या /ahmednagar /धक्कादायक ! पोलिसांच्या उपस्थितीतच आरोपीला बेदम मारहाण, घटनेनंतर पोलिसांनी रचला अपघाताचा बनाव

धक्कादायक ! पोलिसांच्या उपस्थितीतच आरोपीला बेदम मारहाण, घटनेनंतर पोलिसांनी रचला अपघाताचा बनाव

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीला बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीला बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीला बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

अहमदनगर, 16 ऑगस्ट : पोलिसांच्या ताब्यातील (Police Custody) आरोपीला नागरिकांकडून बेदम मारहाण (Accused beaten by mob) करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे या घटनेनंतर पोलिसांनी चक्क अपघात झाल्याचा बनाव केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या संपूर्ण घटनेने एकच खळबळ उडाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar District) कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत (Camp Police Station) हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी रात्री उशीरा 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अहमदनगर भिंगार कॅम्प हद्दीतील आरोपी सादीक बिराजदार याला ताब्यात घेण्यासाठी स्थानिक पोलीस आरोपीच्या घरी गेले. यानंतर आरोपीला घेऊन येत असताना आरोपीवर गुन्हा दाखल केलेल्या नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या सादीक बिराजदार याला जबर मारहाण केली. सुरवातीला भिंगार पोलिसांनी हा अपघात असल्याचा बनवा केला आणि तशी नोंद सुद्धा केली.

आरोपीला पोलीस नेत असल्याची माहिती हल्ला करणाऱ्यांना कशी मिळाली? पोलिसांची गाडी असून आरोपीवर हल्ला केला तर नियंत्रण कक्षाला का कळवले नाही? तशी नोंद का घेतली नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणाचा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तपास होणे अपेक्षित आहे. या प्रकरणी रात्री उशिरा वरिष्ठांच्या आदेशानुसार भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे.

BREAKING: सुप्रीम कोर्टासमोर आत्महत्येचा प्रयत्न; एका महिलेसह पुरुषानं घेतलं स्वतःला पेटवून

या प्रकरणात रात्री आरोपी सादीक बिराजदार यांच्या पत्नीने भिंगार पोलीस ठाण्यात 15 ऑगस्ट 2021 च्या रात्री गुन्हा दाखल केला. आपल्या तक्रारीत तिने म्हटलं, माझे पती सादीक बिराजदार, माझी सासु हुरबानो लाडलेसाहब बिराजदार, दोन लहान मुले असे आमचे घरी असतांना आमचे घराचे दार वाजवुन सादीक असा आवाज दिला. तेव्हा माझे पती सादीक बिराजदार यांनी घराचा दरवाजा उघडला असता भिंगार कम्प पोलीस स्टेशनचे दोन पोलीस होता. त्यांनी माझे पतीस त्यांचे सोबत पोलीस स्टेशनला येण्यास सांगितले. तेव्हा माझे पती त्यांचे सोबत घराचे खाली गेले तेव्हा मी घराचे बाहेर बसवुन घेवुन गेले. त्यांचे सोबत असलेला आजीम उर्फ मुनीया सय्यद याने आमचे समोर कुणालातरी फोन लावुन रशीद, सादीक को पोलीस लेके जारी तुम आवो पिछेसे दंडे लेके असे म्हणाला. त्याचकडील मोटार सायकलवरुन तैथुन निघुन गेला.

त्यानंतर मी माझी मामेसासु तसलीम शेख व माझे मामे सासरे रोशनमिय शेख असे तिघे लगेच रिक्षाने त्यांचे मागे पोलीस स्टेशनला येण्यासाठी निधालो. आम्ही भिंगार नाल्या जवळ येत असतांना पोलीसांची गाडी थांबली असल्याचे दिसले. त्यावेळी तेथे बाजुलाच एक रिक्षा सुध्दा त्या ठिकाणी थांबलेली दिसली आणि चार ते पाच लोक त्यात 1) मुनीया उर्फ अजीम रसुल सय्यद, 2) रशीद रसुल सय्यद, 3) कुददुस रशीद सय्यद, 4) मोईन मुनीया उर्फ अजीम सय्यद, 5) अर्शद मुनीया उर्फ अजीम सय्यद सर्व रा. दर्गादायरा, मुकुंदनगर, अहमदनगर सर्व रा. दर्गादायरा, मुकुंदनगर, अहमदनगर हे सादीक ला पोलिसांच्या गाडीतून बाहेर काढून लोखंडी रडने डोक्यात व इतर ठिकाणी मारहाण करतांना रोडचे लाईटचे उजेडात दिसले. त्यानंतर पोलिसांनी त्याला गाडीमध्ये बसवून घेवून गेले.

पोलिसांची प्रतिक्रिया

अहमदनगर भिंगार कॅम्प पोलीस हद्दीत 1 महिन्यापूर्वी 376 अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता त्या आरोपीला अटक करण्यासाठी कॅम्प पोलिसांचे दोन कर्मचारी आरोपीच्या घरी जाऊन आरोपीला ताब्यात घेतले होते मात्र भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या भिंगार नाल्या जवळ पोलिसांची उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना आरोपी जखमी झाला असल्याची फिर्याद पोलिसांनी दिली आहे. अशा दोन फिर्यादी अहमदनगरच्या भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल झाल्या असून एका प्रकरणाचा तपास सुरू असून दुसऱ्या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले

First published:
top videos

    Tags: Ahmednagar