शिर्डी साई संस्थानचे विश्वस्त मंडळ पुन्हा लांबणीवर; वाटपावरुन मविआ सरकारमध्ये मतभेद?

शिर्डी साई संस्थानचे विश्वस्त मंडळ पुन्हा लांबणीवर; वाटपावरुन मविआ सरकारमध्ये मतभेद?

शिर्डीतील साई संस्थानचे विश्वस्त मंडळ जाहीर करण्याबाबतचा अद्यापही अंतिम निर्णय झाल्याची माहिती समोर येत आहे.

  • Share this:

शिर्डी, 23 जून: कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील साई संस्थानचे (Shirdi Sai Sansthan) विश्वस्त मंडळ वाटपावर मंगळवारी (23 जून 2021) तोडगा निघाल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र, आज राज्य सरकारने (Maharashtra Government) औरंगाबाद खंडपीठात दिलेल्या माहितीवरुन या वाटपावर अद्यापही निर्णय झाला नसल्याचं दिसत आहे.

शिर्डी संस्थानचे विश्वस्त मंडळ अद्यापही जाहीर झालेले नाहीये. राज्य सरकारने विश्वस्त मंडळ जाहीर कऱण्यासाठी आणखी दोन आठवड्यांची मुदत मागितली आहे. वाटपाबाबत अंतिम निर्णय झालेला आहे आणि दोन आठवड्यांत विश्वस्त मंडळ जाहीर करूदोन आठवड्यांत विश्वस्त मंडळ जाहीर करु अशी ग्वाही राज्य सरकारकडून औरंगाबाद खंडपीठात देण्यात आली आहे. त्यानंतर औरंगाबाद खंडपीठाने सुद्धा दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली आहे.

शिर्डीतील साई संस्थानचे विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदावर आणि उपाध्यक्षपदावर आपली वर्णी लागावी यासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी फिल्डिंग लावली होती. त्यानंतर मंगळवारी मविआ सरकारच्या समन्वय समितीच्या बैठकीत शिर्डी संस्थान अध्यक्षपद राष्ट्रवादीला तर विठ्ठल रुक्मिणी देवस्थान पंढरपूर काँग्रेसच्या पारड्यात गेल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र, आता राज्य सरकारने कोर्टात दिलेल्या माहितीनंतर आता विश्वस्त मंडळावर कुणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरू झाली आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांनी दावा

शिर्डी साई संस्थान अध्यक्षपदावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांनी दावा केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांतील मतभेदामुळे पुन्हा हा निर्णय मागे घेतला आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत महामंडळांच्या नियुक्त्या 15 दिवसांत जाहीर करण्यात येणार असल्याचं निश्चित करण्यात आलं.. तिन्ही पक्षांना समसमाना वाटप आणि अपक्षांनाही हिस्सा देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

Published by: Sunil Desale
First published: June 23, 2021, 5:29 PM IST

ताज्या बातम्या