मराठी बातम्या /बातम्या /ahmednagar /

तिला जगायचंच नव्हतं! विष प्राशन करून बचावली तरुणी; पण रुग्णालयातच घेतला गळफास

तिला जगायचंच नव्हतं! विष प्राशन करून बचावली तरुणी; पण रुग्णालयातच घेतला गळफास

Suicide in Ahmednagar: पहिल्यांदा विष प्राशन केल्यानंतर तरुणी बचावली (survived after poisoning) होती. पण दुसऱ्या वेळी गळफास घेतल्यानं तिला कोणीच वाचवू शकलं नाही.

  • Published by:  News18 Desk

अहमदनगर, 27 जून: नगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथील एका 17 वर्षीय तरुणीनं दोनवेळा आत्महत्येचा (Suicide) प्रयत्न केला आहे. पहिल्यांदा विष प्राशन केल्यानंतर ती बचावली (survived after poisoning) होती. पण तिला जगायची अजिबात इच्छा नसल्यानं तिनं रुग्णालयात उपचार सुरू असताना गळफास घेऊन आत्महत्या (Young woman commits suicide) केली आहे.

कुटुंबीयांच्या आणि डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे संबंधित तरुणीला एकदा बचावता आलं. पण दुसऱ्यांदा कोणीही काही करू शकलं नाही. आत्महत्या केल्यानं तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही.

पायल सुभाष मुसमाडे असं या आत्महत्या केलेल्या 17 वर्षीय तरुणीचं नाव आहे. पायलनं पाच दिवसांपूर्वी विषारी औषध पिऊन आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता. याची माहिती कुटुंबीयांना मिळताचं त्यांनी त्वरित तिला राहुरी येथील येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. याठिकाणी तरुणीवर उपचार केले जात होते. विष प्राशन केल्यानंतरही ती या दुर्घटनेतून सुखरूप बचावली होती. पण तिला जगायचंच नव्हतं.

हेही वाचा-सोनं गहाण ठेवून घेतलं पीककर्ज; हफ्ते फेडता न आल्यानं शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळलं

त्यामुळे तिनं उपचार सुरू असतानाचं, रुग्णालयात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेनं कुटुंबीयांची पायाखालची जमीनचं सरकली आहे. पायलनं नेमक्या कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली? याबाबत काहीही माहिती समोर आली नाही. तसेच आत्महत्येपूर्वी काही सुसाईड नोट लिहिली होती का? याचा तपास केला. मात्र सुसाईड नोटही सापडली नाही. त्यामुळे दोनवेळा आत्महत्या करण्यामागचं कारण अजूनही गूढ बनलं आहे. पोलीस आत्महत्येच्या कारणाचा शोध घेत आहेत.

First published:

Tags: Ahmednagar, Crime news, Suicide