Home /News /ahmednagar /

'शिवसैनिक कोणत्याही पक्षात गेला तरी त्याची ओळख शिवसैनिकच राहते' राऊतांचा नारायण राणेंना टोला

'शिवसैनिक कोणत्याही पक्षात गेला तरी त्याची ओळख शिवसैनिकच राहते' राऊतांचा नारायण राणेंना टोला

Sanjay Raut: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नारायण राणेंना टोला लगावला आहे.

अहमदनगर, 31 जुलै : संसदेत आज अनेक खासदारांना ओळखले जात नाही, मात्र शिवसेनेच्या खासदारांना (Shiv Sena MP) ओळखले जाते. शिवसैनिक म्हणून एक वेगळी ओळख आहे. तो नारायण राणे (Narayan Rane), तो आमुक - तमुक असं बोलत नाही. हा शिवसेनेचा आहे असे म्हणूनच म्हणूनच ओळखतात असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नारायण राणे यांना टोला लगावला आहे. सहकार सम्राटांची ओळख असलेला नगर जिल्हा शिवसेनेचा नंबर एकचा ‌जिल्हा व्हावा, ज्या जागा आपण हारलो आहोत त्याही जिंकायच्या आहेत. सहकाराची जाण असलेले शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) शिवसेनेत आहेत त्यांनी पक्षवाढीसाठी प्रयत्न करावेत. शंकरराव गडाख निवडून आल्यानंतर सुरूवातीपासुन शिवसेनेसोबत उभे आहेत कुंपनावर नाही अस वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. सोनई येथील शिवसंवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, सदाशिव लोखंडे आदी उपस्थित होते. सरकार असुन शिवसैनिकांची कामे होत नाही असं म्हणू नका सत्ता हा मानसिक आधार आहे. सत्ता असो वा नसो तरी शिवसेना स्टाईलने अधिकाऱ्यांकडून कामे करून घ्या. सत्ता असल्याने आम्ही अधिकाऱ्यांना दम देवू शकतो. गडचिरोली पाठवू का ? असा दम देवू शकतो म्हणून सत्ता हा मानसिक आधार आहे. पंतप्रधान मोदी देखील मला म्हणतात कैसे हो भाई ? याला सत्ता म्हणतात. शिवसेनेत माज असायलाच हवा. कुणी मवाली, गुंड म्हटलं तरी चालेल. वाघासारखे जन्माला आलो वाघासारखे मरणार... शंकरराव गडाख सध्या सौम्य बोलतात, तुम्हीही हळूहळू डरकाळी फोडाल अशा शैलीत खासदार संजय राऊत यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना म्हटलं आहे. मी पुन्हा येईन... मी पुन्हा-पुन्हा येईन.... जोपर्यंत नगर जिल्हयात शिवसेनेचा ‌झेंडा तोपर्यंत पुन्हा पुन्हा येईन असं मिश्किल भाष्य करताना दिल्लीच्या‌ तक्तावरही भगवा फडकवू, हारलेल्या जागा पुन्हा जिंकायच्या आहेत तीच खरी बाळासाहेबांना मानवंदना ठरेल असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Narayan rane, Sanjay raut, Shiv sena

पुढील बातम्या