यावेळी संभाजीराजेंनी शेतामधील औतावर बसून जेवण केलं. त्यांच्यासोबत असलेल्या इतर कार्यकर्त्यांनीही शेतातच जेवण उरकले. यावेळी शेतामधील आवतावर बसून जेवण केल्याने या साधेपणाचे जेवणाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. दरम्यान, कोपर्डी अत्याचार झालेल्या पीडित महिलेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी छत्रपती संभाजीराजे आज कोपर्डी आले होते. या वेळी संभाजीराजेंनी कोपर्डीच्या भगिनी यांना अभिवादन केले आणि पीडित कुटुंबाशी चर्चा केली. या वेळी आपल्याला न्याय मिळाला नाही, अशा भावना पीडित कुटुंबांनी राजे यांच्या समोर मांडल्या होत्या. Fish Lover नी लग्नात घातला राडा; एका माशाच्या तुकड्यासाठी मारहाण, 11 जणं जखमी कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे. सरकारने या खटल्यासाठी विशेष बेंच स्थापन करून खटला फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवावा आणि लवकरात लवकर पीडित कुटुंबातील न्याय द्यावा, अशी मागणी संभाजीराजे यांनी केली आहे. 'मी राष्ट्रपती नियुक्त खासदार' तसंच, मी शिवाजी महाराजांचा आणि शाहू महाराजांच्या वंशज आहे, मी लोकांना वेठीस धरू शकत नाही मी 2007 पासून मराठा समाजाचा लढा देत आहे. हे केव्हा आले हेच मला माहित नाही. हे त्यांनाच विचारा आणि मला कोणी कोणी शिकवण्याची गरज नाही जर मला देवेंद्र फडणवीस सल्ला देत असतील तेव्हा मी बोलेल. हे काय आता मला माहित नाही सकाळपासून संभाजीराजे त्यांना दिसायला लागले चांगली गोष्ट आहे. मला माहित आहे, देवाचे मंत्र सकाळीच बोलतात. मात्र आता संभाजीराजांचा मंत्र डोक्यात यायला लागलाय याची कारणे त्यांच्या हृदयात आहे. हे त्यांनाच विचारा मी काय ज्योतिषी नाही शिवाजी महाराजांनी, शाहू महाराजांनी ज्योतिषाला मानलाच नाही तर मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे, असा टोलाही त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लावला.संभाजीराजेंचा साधेपणा, कोपर्डी अहमदनगर व औरंगाबाद दौऱ्यात शेतात थांबून केली न्याहारी pic.twitter.com/pzKKl8OXAC
— News18Lokmat (@News18lokmat) June 12, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: संभाजीराजे