कर्जत, 09 जुलै: मागील दीड वर्षांपासून जगभरात कोरोना विषाणूनं थैमान (Corona pandemic) घातलं आहे. याला भारत देशही अपवाद ठरला नाही. परिणामी देशात जारी केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या (Lost jobs) आहेत. तर काहींचे व्यवसाय ठप्प झाल्यानं त्यांना कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. एकीकडे लोकांकडे नोकऱ्या नसल्यानं आपला व्यवसाय वाचवण्यासाठी आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी अनेकजण खाजगी सावकाराकडून कर्ज (take loan from private lenders) घेत आहेत. खाजगी सावकाराकडूनही चक्रवाढ व्याजानं (High interest) कर्ज देवून नागरिकांची लूट सुरू केली आहे.
असंच एक प्रकरण कर्जतमध्ये घडलं आहे. येथील एका खाजगी सावकारानं 1 लाख रुपयांसाठी दिवसाला तब्बल एक हजार रुपये या प्रमाणात कर्ज देऊन एका व्यक्तीचा छळ केला आहे. मुद्दलपेक्षा अधिक पैसे देऊनही आरोपीकडून होत असलेल्या त्रासामुळे पीडित व्यक्तीनं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी कर्जत पोलिसांनी कर्जतमधील खाजगी सावकार एजाज उर्फ भोप्या सय्यद याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी 27 वर्षीय तरुणानं फिर्याद दाखल केली आहे.
हेही वाचा-पैसे, सोनं, चांदी नव्हे चोरायचा फक्त महिलांच्या चपला; पोलिसांनी पकडला अजब चोर
फिर्यादी तरुण हा ट्रॅव्हलिंगचा व्यवसाय करतो. पण मागील वर्षी जारी केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व गाड्या घरीच होत्या. पण गाडीचे हप्ते भरण्यासाठी फिर्यादीनं एजाज उर्फ भोप्या सय्यद याच्याकडून ऑक्टोबर 2020 मध्ये व्याजानं 2 लाख रुपये उसने घेतले. मात्र आरोपीनं फिर्यादीची गरज लक्षात घेऊन एक लाख रुपयाला प्रतिदिन 1 हजार रुपये असा व्याजदर ठेवला. त्यानंतरही ट्रॅव्हलिंगचा व्यवसाय व्यवस्थित चालत नसल्यानं फिर्यादीनं सय्यद याच्याकडून टप्प्याटप्प्यानं आणखी दीड लाख रुपये घेतले. या सर्व रकमेला आरोपी एक लाख रुपयाला एक हजार रुपये याप्रमाणेच व्याज आकारत होता.
हेही वाचा-खून प्रकरणातील आरोपीची आत्महत्या; ग्रामसभेनं कलेक्टरला ठोठावला 25 लाखांचा दंड
पुढारीनं दिलेल्या वृत्तानुसार, आरोपीनं लागू केलेल्या चक्रवाढ व्याजामुळे व्याजाची रक्कम थेट 6 लाख रुपयांवर गेली. याप्रकरणी फिर्यादीनं व्याजापोटी तीन लाख रुपये परत केले. पण तीन लाख रुपये देवूनही फिर्यादीनं आणखी 9 लाख रुपये द्यावेत, यासाठी आरोपीनं तगादा लावला. आरोपी पैसे वसूल करण्यासाठी दमदाटी शिवीगाळ देखील करत होता. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून फिर्यादीनं कर्जत पोलीस ठाण्यात आरोपी भोप्या सय्यद याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. कर्जत पोलिसांनी महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 च्या कलम 39 सोबत अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील कारवाई पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ahmednagar, Crime news