Home /News /ahmednagar /

पिकअपची दुचाकीला जोरदार धडक; मुलाच्या डोळ्यादेखत आईनं सोडला जीव, मुलगा गंभीर जखमी

पिकअपची दुचाकीला जोरदार धडक; मुलाच्या डोळ्यादेखत आईनं सोडला जीव, मुलगा गंभीर जखमी

Road Accident: दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या मायलेकावर काळानं घाला घातला आहे. पिकअपने जोरदार धडक मारल्यानं, उंच फेकल्या गेलेल्या आईचा जागीच मृत्यू (Mother died) झाला आहे.

    आष्टी, 16 जुलै: आष्टी तालुक्यातील कडा सहकारी साखर कारखान्याजवळ एका पिकअप गाडीनं दुचाकीला जोरदार धडक (Accident) दिल्याची घटना समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेत दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या मायलेकावर काळानं घाला घातला आहे. पिकअपने जोरदार धडक मारल्यानं, उंच फेकल्या गेलेल्या आईचा जागीच मृत्यू (Mother died) झाला आहे. तर मुलगा गंभीर जखमी (Son injured) झाला आहे. जखमी तरुणाला अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्याच पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल (FIR Lodged) केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आष्टी पोलीस करत आहे. रुक्मिणी संतोष बोडखे (वय-37) असं अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. मृत रुक्मिणी ह्या गुरुवारी सकाळी आपला प्रवीण संतोष बोडखे याला घेऊन आष्टीवरून कड्याच्या दिशेनं आपल्या गावी चालल्या होत्या. दरम्यान वाटेत असणाऱ्या कडा सहकारी साखर कारखान्याजवळ पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव पिकअपनं दुचाकीला जोरदार घडक मारली. दुचाकीवर  पाठीमागे बसलेल्या रुक्मिणी बोडखे या उंच उडून रत्यावर पडल्या, तर दुचाकी पिकअपसोबत तब्बल 400 मीटर फरफटत गेली. हेही वाचा-पतीचा खून करून रचला आत्महत्येचा बनाव; अंत्यसंस्काराच्या वेळी उलगडलं हत्येचं गूढ या दुर्दैवी घटनेत रुक्मिणी यांचा जागीचं मृत्यू झाला. तर 21 वर्षीय मुलगा प्रवीणही या दुर्घटनेत गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात घडल्यानंतर आसपासच्या लोकांनी जखमी प्रवीणला त्वरित रुग्णालयात दाखल केलं. अहमदनगर येथील एका खाजगी रुग्णालयात सध्या प्रवीणवर उपचार सुरू आहेत. याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. हेही वाचा-सांगली: तीन महिन्यातच मोडला संसार; कोरोनाच्या धास्तीनं अभियंत्यानं संपवलं जीवन या घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलिसांन पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भरधाव पिकअपने धडक दिल्यानंतर अपघातग्रस्त झालेल्या मुलाच्या डोळ्यादेखत आईनं प्राण सोडला आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ahmednagar, Crime news, Death, Road accident

    पुढील बातम्या