Home /News /ahmednagar /

Ahmednagar: राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष विजय औटी यांची पाणी पुरवठा अभियंत्याला मारहाण, Video व्हायरल

Ahmednagar: राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष विजय औटी यांची पाणी पुरवठा अभियंत्याला मारहाण, Video व्हायरल

Ahmednagar Crime News: अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष विजय औटी यांनी एका अभियंत्याला बेदम मारहाण केली आहे.

अहमदनगर, 5 एप्रिल : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर नगरपंचायतीचे (Parner Nagar Panchayat) नगराध्यक्ष विजय औटी (Vijay Auty) यांनी स्वच्छता आणि पाणीपुरवठा विभागाचे अभियंत्याला मारहाण केली आहे. अभियंता सचिन राजभोज यांना मारहाण केल्याचा व्हिडीओ (video) समोर आला आहे. भरदिवसा कार्यालयात ही मारहाण करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मारहाणीची घटना कार्यालयातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या व्हिडीओमध्ये नगराध्यक्ष  विजय औटी यांनी मारहाण करत असताना नगरपंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुनीता कुमावत यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण औटी आणि त्यांचे कार्यकर्त्यांनी त्यांना न जुमानता मारहाण करत असल्याचा व्हिडीओतून समोर आलं आहे. सचिन राजभोज हे पारनेर नगरपंचायत मध्ये स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाचे अभियंता म्हणून काम करतात. शहरातील पाणीपुरवठा विभातील बंद पडलेल्या मोटारी जमा करण्याचे काम हाती घेण्यात आले होते, त्यावेळेस नगराध्यक्ष विजय औटी आणि त्यांचे कार्य कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप होत आहे. वाचा : काँग्रेस आमदारांनी घेतली सोनिया गांधींची भेट, 35 मिनिटांच्या बैठकीत मंत्र्यांची केली तक्रार - सूत्रांची माहिती पुण्यात सराफाच्या गळ्याला कोयता लावून लुटलं ज्वेलरी शॉप पुणे शहरांमध्ये दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्यांना पुणे पोलिसांचा धाकच राहिला नाही असेच या घटनेतून दिसत आहे. हातात कोयते घेऊन रस्त्यावर नागरिकांमध्ये दहशत पसरवणारे गुंड पुण्यात सक्रिय झालेत. लोहगावात सराफ व्यवसायकाच्या गळ्याला कोयता लावून लुटण्यात आलं आहे. व्यावसायिकाला कोयत्याचा धाक दाखवून 73 हजारांचे दागिने चोरट्यांनी लांबवले. ही घटना लोहगाव परिसरात घडली व्यवसायिकांनी विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. ही संपूर्ण घटना ज्वेलरी शॉपमधील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. आझाद चौकात महाले ज्वेलर्स सराफमध्ये दोन चोरटे दुकानात शिरले त्यांनी दागिने खरेदी करण्याचा बहाना केला. एकाने सराफ व्यवसायकला कोयत्याचा धाक दाखवला तर दुसऱ्या चोरट्यांनी पकडून ठेवलं आणि त्यानंतर दुकान लुटलं.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Ahmednagar, Cctv footage, Crime

पुढील बातम्या