Home /News /ahmednagar /

MPSC परीक्षेच्या निकालावरून रोहित पवारांचा सरकारला घरचा अहेर

MPSC परीक्षेच्या निकालावरून रोहित पवारांचा सरकारला घरचा अहेर

'कोरोनामुळे स्थगित केलेली MPSC ची परीक्षा आणि प्रलंबित निकाल व नियुक्त्यांमुळं युवा पिढी नैराश्यात आहे'

  अहमदनगर, 04 जुलै: पुण्यात MPSC चा विद्यार्थी स्वप्नील लोणकर (Swapnil Lonkar) या 24 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.  एमपीएससी परीक्षा (MPSC exam) वेळेवर घ्याव्यात आणि वेळेवर निकाल लावावेत, असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सरकारला घरचा अहेर दिला आहे. एमपीएससी परीक्षा आणि निकालाच्या दिरंगाई वरून आमदार रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. रोहित पवार यांनी ट्वीट करून राज्य सरकारला विनंती केली आहे.

   कोरोनामुळं स्थगित केलेली #MPSC ची परीक्षा आणि प्रलंबित निकाल व नियुक्त्यांमुळं युवा पिढी नैराश्यात आहे. माझी राज्य सरकारला विनंती आहे की, आवश्यक ती सर्व दक्षता घेऊन ही परीक्षा त्वरित घेण्यात यावी आणि प्रलंबित नियुक्त्याही तातडीने देण्यात याव्यात.@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks

  — Rohit Pawar (@RRPSpeaks) July 4, 2021 'कोरोनामुळे स्थगित केलेली MPSC ची परीक्षा आणि प्रलंबित निकाल व नियुक्त्यांमुळं युवा पिढी नैराश्यात आहे. माझी राज्य सरकारला विनंती आहे की, आवश्यक ती सर्व दक्षता घेऊन ही परीक्षा त्वरित घेण्यात यावी आणि प्रलंबित नियुक्त्याही तातडीने देण्यात याव्यात' अशी मागणी रोहित पवार यांनी केली. पुण्यातील एमपीएससीची परीक्षा पास होऊन मुलाखत होण्याची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांने नैराश्यातून आत्महत्या केली आहे. स्वप्नील लोणकर असं या विद्यार्थ्यांचं नाव असून एमपीएससी मुख्य परीक्षा पास होऊन दीड वर्ष झालं तरी मुलाखत होत नसल्याने त्याने आत्महत्या केली आहे. त्याच्या मृत्यूबद्दल रोहित पवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे. लवकरच तोडगा काढणार - आदित्य ठाकरे तर दुसरीकडे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही या घटनेबद्दल तीव्र वेदना व्यक्त केल्या आहे. एमपीएससी परीक्षेच्या बाबतची चर्चा आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार आहे. एमपीएससी परीक्षेच्या निकालाबद्दल थोडी गैरसोय होत आहे, त्याच्यातून मार्ग काढण्यात येईल' असं आश्वासन आदित्य ठाकरे यांनी दिलं.

  केतकी दवे यांनी का सोडली ‘क्योकी सास भी कभी बहु थी’? 21 वर्षानंतर सांगितलं कारण

  तर दुसरीकडे, भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही तीव्र वेदना व्यक्त करत ठाकरे सरकाराला सूचना केली आहे. 'स्वप्नील लोणकर आत्महत्या केल्याची घटना दुर्देवी आहे, एकूणच MPSC च्या कार्यपद्धतीचे नव्याने अवलोकन करणे आवश्यक आहे, अनेक जागा रिक्त आहेत, परीक्षा उशिरा होतात, अनेक तरुण स्वायत्तता हवी आहे पण स्विराचार नको आहे', असं फडणवीस म्हणाले. माझा तळतळाट लागेल, एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या करावी' दरम्यान, 'माझ्या मुलाने परीक्षा दिली होती, त्याची मुलाखत होत नव्हती त्यामुळे त्याने हे पाऊल उचलले. माझा तळतळाट आहे की, एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या करावी, तेव्हा या सरकारला कळेल मुलगा जाण्याचे दु:ख काय असते' असं म्हणत स्वप्नील लोणकरच्या आईने आक्रोश केला आहे. NAL Recruitment 2021: नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीजमध्ये विविध पदांसाठी भरती स्वप्नीलबद्दल बोलत असताना त्याच्या आईला अश्रू अनावर झाले. आज माझ्या मुलाच्या जागी एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या केली असती तर मंत्र्याला जाग आली असती का? माझा मुलगा हुशार होता. त्याने चांगले शिक्षण घेतलं होतं. माझा तळतळाट आहे की, एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या करावी मग यांना कळेल. मुलाच्या जाण्याचे दु: ख काय असते. यांनी दुसऱ्यांच्या मुलांचाही विचार करावा, त्यांच्यावर काय परिस्थिती ओढावली असेल हे कळेल, असं म्हणत स्वप्नीलच्या आईने अश्रूना वाट मोकळी करून दिली. या राजकारण्यांना कुणाशी काहीही घेणं देणं नाही. नुसते भांडणे सुरू आहेत. कुणाला काय त्रास होतोय, हे यांना काय माहिती, त्यांना फक्त राजकारणाचं पडलंय. माझा स्वप्नील मला म्हणायला, आई मुलाखत झाली नाही. परीक्षा पास झालोय पण दोन वर्ष झाली. खूप झुरला माझा लेक, पण यांची लेकरं सुरक्षित आहे, म्हणून यांना गरिबांशी काहीही घेणं-देणं नाही. लोकांच्या वेदना यांना कळणार नाही, असा आक्रोश स्वप्निलच्या आईने व्यक्त केला.
  Published by:sachin Salve
  First published:

  Tags: Ahmednagar, Ahmednagar News, Maharashtra, Mpsc examination, Mumbai, Rohit pawar

  पुढील बातम्या