मराठी बातम्या /बातम्या /ahmednagar /

संगमनेरमधील 2 वर्षाच्या चिमुकलीनं केला विश्वविक्रम; ठरली 'गर्ल विथ हाय मेमरी स्किल'ची मानकरी

संगमनेरमधील 2 वर्षाच्या चिमुकलीनं केला विश्वविक्रम; ठरली 'गर्ल विथ हाय मेमरी स्किल'ची मानकरी

संगमनेर येथील प्राध्यापिका प्रवरा विशाल उबाळे यांची कन्या प्रविशा विशाल उबाळे हिने वयाच्या अवघ्या  दुस-या वर्षी स्वतःचं नाव OMG बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये (OMG Book of Record) नोंदवलं आहे. गर्ल वीथ हाय मेमरी स्किल्स"(High Memory Skills) या शीर्षकाखाली प्रविशा उबाळे हिच्या नावाची नोंद झाली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Kiran Pharate

अहमदनगर 28 मे : काही लहान मुलांची विचार करण्याची किंवा एखादी गोष्ट अगदी लवकर लक्षात ठेवण्याची क्षमता ही मोठ्यांनाही मागे टाकते. अगदी कमी वयात ही मुलं अनेक नवीन गोष्टी शिकतात आणि आसपासच्या सर्वांनाच थक्क करतात. अशीच आणखी एक बातमी समोर आली आहे अहमदनगरच्या (Ahmednagar) संगमनेरमधून (Sangamner). संगमनेर येथील प्राध्यापिका प्रवरा विशाल उबाळे यांची कन्या प्रविशा विशाल उबाळे हिने वयाच्या अवघ्या दुस-या वर्षी स्वतःचं नाव OMG बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये (OMG Book of Record) नोंदवलं आहे. . "ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये गर्ल वीथ हाय मेमरी स्किल्स"(High Memory Skills) या शीर्षकाखाली प्रविशा उबाळे हिचे नाव आणि तिने केलेल्या गोष्टींची नोंद झाली आहे.

महाराष्ट्रातील संत, सोशल मिडिया आयकॉन्स ,पन्नासहून अधिक प्राणी-पक्षी, फळे ,वाहने, मानवी अवयव, रंगांच्या सर्व छटा, भूमितीय आकार, इंग्रजीतील अक्षरे, अंक अगदी अचूकपणे प्रविशा सांगत आहे. प्रविशाला प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं आहे. प्रविशा वयाच्या ९ व्या महिन्यापासूनच चौकस होती. एका वर्षाची होईपर्यंत तिने नवनवीन गोष्टी शिकण्यात आवड दाखवली.

प्रविशा ही अनेक इंग्रजी शब्द, अंक, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, गौतम बुद्ध इत्यादी संत, सोशल मीडीया आयकॉन्स, शरीराचे सर्व अवयव, रहदारीची वाहने, पाळीव तसेच जंगली प्राणी, टीव्हीवरील कलाकार, इंद्रधनुचे रंग, फळे, भाज्या, प्राण्यांचे, पक्ष्यांचे आवाज ओळखणे यात निपूण आहे. ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदणी तसेच पुढील प्रक्रिया याचं काम OMG बुकचे प्रतिनिधी म्हणून राहुल बनसोडे यांनी पाहिले.

First published:

Tags: Ahmednagar, Positive story