Home /News /ahmednagar /

नातेवाईकांसाठी भलताच खटाटोप; आरोग्य कर्मचाऱ्यानं नगरमधून चोरली लस

नातेवाईकांसाठी भलताच खटाटोप; आरोग्य कर्मचाऱ्यानं नगरमधून चोरली लस

Crime in Ahmednagar: भारतात कोरोना विषाणूची दुसरी लाट (Corona virus 2nd wave) आल्यापासून अनेकांनी याचा धसका घेतला आहे. यातूनच एका आरोग्य कर्मचाऱ्यांने आपल्या नातेवाईकांसाठी लस चोरली आहे.

    अहमदनगर, 06 जून: भारतात कोरोना विषाणूची दुसरी लाट (Corona virus 2nd wave) आल्यापासून अनेकांनी कोरोना विषाणूचा (Corona Virus) भलताच धसका घेतला आहे. दुसरीकडे देशात कोरोना प्रतिबंधात्मक लशीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा (Lack of vaccine) जाणवत आहे. त्यामुळे लस मिळवण्यासाठी नागरिकांकडून वेगवेगळी शक्कल लढवली जात आहे. अलीकडेच एका प्रसिद्ध अभिनेत्रीने आरोग्य कर्मचाऱ्याचं बनावट ओळखपत्र दाखवून कोरोना लस घेतली होती. अशातच नगरमधील एका व्यक्तीने आपल्या नातेवाईकांचं लसीकरण करता यावं, म्हणून भलताच खटाटोप केला आहे. आपल्या नातेवाईकांना लस देण्यासाठी त्याने आरोग्य केंद्रातून लस चोरली आहे. पण आरोग्य कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे त्याचं बिंग फुटलं आहे. संबंधित आरोपीचं नाव विठ्ठल खेडकर असून तो अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील चापडगाव येथील आरोग्य केंद्रात वैद्यकीय कर्माचारी म्हणून कार्यरत आहे. त्याने आपल्या नातेवाईकांचं लसीकरण करण्यासाठी संबंधित आरोग्य केंद्रातील लशीची एक व्हायल चोरली. संबंधित चोरी केलेली लस घेऊन आरोपी खेडकर आष्टी तालुक्यातील कडा येथील आरोग्य केंद्रात आला. हे ही वाचा-मुंबईत डॉक्टर तरुणीची आत्महत्या; भुलीच्या इंजेक्शनचा ओव्हरडोस घेऊन दिला जीव याठिकाणी त्याने सोबत आणलेली लस आपल्या सहा नातेवाईकांना देण्याची विनंती केली. पण हा गंभीर प्रकार येथील आरोग्य कर्मचाऱ्याच्या लक्षात आल्यानंतर, त्याने याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. या गंभीर घटनेची दखल घेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर बी पवार यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी लस चोरी करणारा आरोग्य कर्मचारी विठ्ठल खेडकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ahmednagar, Crime news, Theft

    पुढील बातम्या