मराठी बातम्या /बातम्या /ahmednagar /

'मला कुणी शिकवण्याची गरज नाही', संभाजीराजेंचा चंद्रकांत पाटलांना सणसणीत टोला

'मला कुणी शिकवण्याची गरज नाही', संभाजीराजेंचा चंद्रकांत पाटलांना सणसणीत टोला

'सकाळपासून त्यांना संभाजीराजे दिसत आहे. ज्या प्रकारे सकाळी आरती लावतो तसं चंद्रकांत पाटलांचं झालं आहे'

'सकाळपासून त्यांना संभाजीराजे दिसत आहे. ज्या प्रकारे सकाळी आरती लावतो तसं चंद्रकांत पाटलांचं झालं आहे'

'सकाळपासून त्यांना संभाजीराजे दिसत आहे. ज्या प्रकारे सकाळी आरती लावतो तसं चंद्रकांत पाटलांचं झालं आहे'

  • Published by:  sachin Salve

अहमदनगर, 12 जून : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) कोल्हापूरमध्ये 16 तारखेला आंदोलन करण्यात येणार आहे. पण या आंदोलनावरून भाजपचे खासदार संभाजीराजे  (Sambhajiraje) आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. मला कुणी काही शिकवण्याची गरज नाही, मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे, अशा शब्दांत संभाजीराजेंनी चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर दिले.

संभाजीराजे यांनी कोपर्डी इथं जाऊन निर्भयाच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना संभाजीराजे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

कोपर्डी प्रकरणानंतर 58 मोर्चे निघाले होते. याची दखल संपूर्ण देशाने घेतली. पीडितेच्या कुटुंबीयांनी न्याय मिळावा अशी विनंती केली. गेली 4 वर्ष खटला न्यायलयात आहे. शाहू-फुले-आंबेडकर यांच्या राज्यात आपण राहतोय. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे, स्पेशल बेंच तयार करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करणार आहे, अशी माहिती संभाजीराजेंनी दिली.

'मै माधुरी दीक्षित बनना चाहती हूँ' फेम अभिनेत्री आज जगते असं आयुष्य; पाहा PHOTO

'मी छत्रपती महाराजांचा वंशज आहे. त्यामुळे लोकांना मी वेठीस धरू शकत नाही. २००७ पासून मी मराठा समाजाच्या लढ्यात सहभागी आहे. हे कधी आंदोलनात आले हे मला माहिती नाही. मला कुणी शिकवण्याची गरज नाही. जर देवेंद्र फडणवीस यांनी काही सल्ला दिला तर मी त्यावेळी बोलेल', असा टोला संभाजीराजे यांनी लगावला.

तसंच, 'सकाळपासून त्यांना संभाजीराजे दिसत आहे. ज्या प्रकारे सकाळी आरती लावतो तसं चंद्रकांत पाटलांचं झालं आहे. त्यांच्या मनात असं का येतंय हे मला माहिती नाही. मी काही ज्योतिषी नाही. त्यामुळे तेच याबद्दल सांगू शकतील. शिवरायांनीही कधी ज्योतिषींना मानले नव्हते. मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे', असा सणसणीत टोलाही संभाजीराजेंनी पाटलांना लगावला.

कुंडलीतली गुरुची स्थिती बघून घाला अंगावर सोनं, नाहीतर होऊ शकतो तोटा

तर दुसरीकडे, सांगलीमध्ये पत्रकारांशी बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा संभाजीराजेंवर निशाणा साधला होता. 'संभाजीराजे यांनी मोर्चाची घोषणा केली होती. हे प्रसारमाधम्यांनी दाखवलं, वृत्तपत्रात आलं आहे. जर हे खोटं असेल तर त्यांनी त्यांनी प्रसारमाध्यमांवर खटला दाखल करावा, त्यांना वकिल लागले तर मी देण्यास तयार आहे' असा टोला पाटील यांनी लगावला होता. तसंच, संभाजीराजे हे भाजपचे खासदार असल्याचे मान्य जर करत नसले तरीही ते ऑन पेपर भाजपचे खासदार आहे, अशी आठवणच पाटील यांनी करून दिली होती.

First published:

Tags: संभाजीराजे