Home /News /ahmednagar /

पत्नीच्या डोक्यात कुदळ घातली तर मुलाला झाडावर फासावर लटकवले, निर्दयी बापाच्या कृत्याने नगर हादरलं

पत्नीच्या डोक्यात कुदळ घातली तर मुलाला झाडावर फासावर लटकवले, निर्दयी बापाच्या कृत्याने नगर हादरलं

आरोपीने या हत्येचे व्हिडिओ आणि फोटो काढून स्वतःच्या व्हॉट्सअॅप स्टेटसला ठेवले आणि गावातील काही लोकांसह सासरी पाठवले होते.

आरोपीने या हत्येचे व्हिडिओ आणि फोटो काढून स्वतःच्या व्हॉट्सअॅप स्टेटसला ठेवले आणि गावातील काही लोकांसह सासरी पाठवले होते.

Ahmednagar Crime: आरोपीने या हत्येचे व्हिडिओ आणि फोटो काढून स्वतःच्या व्हॉट्सअॅप स्टेटसला ठेवले आणि गावातील काही लोकांसह सासरी पाठवले होते.

अहमदनगर, 11 मार्च : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यामध्ये नात्याला काळीमा फासवणारी घटना घडली आहे. किरकोळ पैशाच्या वादातून एकाने पत्नीच्या (wife murder) डोक्यात कुदळ घालून तर मुलाला (son murder) झाडाला फासावर लटकावून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने अहमदनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीरामपूर तालुक्यातील दिघी येथे एका नराधमाने पत्नीशी पैशांच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादातून पत्नी अक्षदा कुदळे आणि पाच वर्षीय मुलगा शिवतेज यांची निर्दयी हत्या केली. त्याने पत्नीला डोक्यात कुदळीचा घाव घालून ठार केले, तर मुलाला अमानुषपणे झाडाला फाशी देत मारून टाकले. धक्कादायक म्हणजे, आरोपीने या हत्येचे व्हिडिओ आणि फोटो काढून स्वतःच्या व्हॉट्सअॅप स्टेटसला ठेवले आणि गावातील काही लोकांसह सासरी पाठवले होते. आरोपी बलराज कुदळे हा श्रीरामपूर शहरानजीक गोंधवणी येथे राहत होता. त्याचे किरकोळ कारणावरून पत्नीशी नेहमी वाद व्हायचे त्याच्या नेहमीच्या कटकटीला कंटाळून काही दिवसांपूर्वी पत्नी अक्षदा ही माहेरी निघून गेली होती. पत्नीला पुन्हा घेऊन आल्यानंतर त्याचा संसार पुन्हा जैसे थे सुरू होता. त्याचे आई वडिलांशी देखील नेहमी वाद होत होते. त्यामुळे पत्नी आणि मुलाला घेऊन तो दिघी - खैरीनिमगाव शिवारात असलेल्या आपल्या शेतावर राहण्यासाठी गेला. (वाचा : गुणरत्न सदावर्ते यांच्या घरी मुंबई पोलिसांकडून झाडाझडती) मात्र, त्याचे पुन्हा किरकोळ पैशाच्या कारणावरून पत्नीशी वाद झाले. १० एप्रिल ( रविवारी ) रोजी सकाळी बलराज याने पत्नी काम करत असताना तिच्या डोक्यात कुदळीने घाव घातल्याने ती जागीच ठार झाली. यानंतर त्याने पाच वर्षांचा मुलगा शिवतेज याला शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास दिला. मुलगा गतप्राण होईपर्यंत तो तेथेच थांबला. या दोन्ही घटनांचे आरोपीने व्हिडिओ चित्रण करत फोटो देखील काढले. (पोलीस चौकशीनंतर प्रवीण दरेकरांचा मोठा दावा, म्हणाले...) दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अतुल बोरसे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अक्षदा कुदळे ही रक्ताच्या थारोळ्यात तर शिवतेज झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. दोन्ही मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. पोलिसांनी आरोपी बलराज कुदळे याला दिघी येथून ताब्यात घेतले असून आपणच या दोन्ही हत्या केल्याची कबुली त्याने दिली आहे. नात्याला काळीमा फासणाऱ्या या दुहेरी हत्याकांडाने श्रीरामपूर तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Ahmednagar, Crime, Murder

पुढील बातम्या