अहमदनगर, 18 सप्टेंबर : भाजपचे (bjp) अनेक नेते आणि आमदार राष्ट्रवादीच्या (ncp) वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे अहमदनगरमधील (ahmednagar) कर्जत तालुक्यात भाजपचे (bjp) नेते आणि माजी मंत्री राम शिंदे (ram shinde) यांना मोठा धक्का बसला आहे. राम शिंदे यांचे खंदे समर्थक आणि कर्जत नगरपंचायतीचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत (namdev raut) यांनी राजीनामा दिला आहे. यामुळे कर्जत तालुक्यातील राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (ncp) प्रवेश करण्याची शक्यता आहे.
कर्जत तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचा मोठा नेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला लागला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हा नेता प्रवेश करणार आहे, अशी पोस्ट सोशल मीडियात गेल्या अनेक दिवसांपासून फिरत होती. पण नक्की कोणाता नेता प्रवेश करणार हे स्पष्ट होत नव्हते अखेर आज कर्जत नगरपंचायतीचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन आपण भारतीय जनता पक्षाचा प्राथमिक व सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे, असं जाहीर केलं. यामुळे भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
नोकरी बदलल्यानंतर ट्रान्सफर करायचे आहेत PF चे पैसे? जाणून घ्या सोपी पद्धत
नामदेव राऊत हे गेल्या पंचवीस वर्षांपासून कर्जत ग्रामपंचायत व कर्जत नगरपंचायतीच्या सत्तेत आहेत. तसंच त्यांच्या पत्नी सुवर्णा राऊत ह्या कर्जत पंचायत समितीच्या सभापती होत्या नामदेव राऊत हे मुळचे शिवसैनिक आहेत. नंतर त्यांना राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. नंतर ते भारतीय जनता पक्षात गेले. आता कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे.
रोहित पवार यांच्या माध्यमातून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, असे संकेत त्यांनी आज अप्रत्यक्षपणे बोलताना दिले. त्यांच्या या निर्णयामुळे माजी मंत्री राम शिंदे व खासदार डॉ सुजय विखे पाटील यांना रोहित पवार यांनी मोठा धक्का दिला आहे. यापूर्वी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, कर्जत नगरपंचायतीचे नगरसेवक बापूसाहेब नेटके, लालासाहेब शेळके, नगरसेविका मनिषा सोनमाळी, सामाजिक कार्यकर्ते सचिन सोनमाळी, नितीन तोरडमल आदींनी यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
शिवसेनेच्याच नेत्याने अनिल परबांची केली पोलखोल? मनसे नेत्याच्या विधानाने खळबळ
नामदेव राऊत यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशानंतर कर्जत शहर व कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. आगामी कर्जत नगरपंचायत निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ही राजकीय घडामोडी लक्षवेधी ठरली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.