Home /News /ahmednagar /

Ahmednagar: वराचे मित्र चांगले नाहीत म्हणून मुलीनं मोडलं लग्न; नगरमधून रिकाम्या हाती परतला नवरदेव

Ahmednagar: वराचे मित्र चांगले नाहीत म्हणून मुलीनं मोडलं लग्न; नगरमधून रिकाम्या हाती परतला नवरदेव

Marriage in Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यातील एका वरासाठी त्याचे मित्र विघ्न ठरले आहेत. एका आलिशान हॉटेलमध्ये दिमाखात साखरपुडा पार पडल्यानंतर, मुलीनं एका अजब कारणामुळे लग्नास नकार दिला आहे.

    अहमदनगर, 04 जुलै: अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील रहिवासी असणाऱ्या एका वरासाठी त्याचे मित्र विघ्न ठरले आहेत. काष्टी येथील एका आलिशान हॉटेलमध्ये पाहुण्यांच्या उपस्थितीत दिमाखात साखरपुडा पार पडल्यानंतर, मुलीनं एका अजब कारणामुळे लग्नास नकार (Bride refused to marriage) दिला आहे. त्यामुळे श्रीगोंद्यातील नवरदेवाला रिकाम्या हाती परत यावं लागलं आहे. नवरीचं लग्न मोडण्याचं कारण ऐकून पाहुणेही हैराण झाले आहे. साखरपुडा झाल्यानंतर हळदी समारंभाची तयारी सुरू असताना, नववधूनं लग्नाला नकार दिला. त्यामुळे विवाहस्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला होता. काष्टी येथील एका आलिशान हॉटेलमध्ये लग्नाचा बॅंडबाजा वाजत होता. दोन्ही बाजूंचे नातेवाईक आनंदानं दोघांच्या लग्नाला उपस्थित राहिले होते. पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. साखरपुडा उरकल्यानंतर हळदी समारंभाची तयारी सुरू असताना, वराचे मित्र चांगले नाहीत, असं कारण देत नवऱ्या मुलीनं चक्क लग्नाला नकार दिला आहे. त्यामुळे श्रीगोंदा येथील रहिवासी असणारा नवरदेव रिकाम्या हाती परतला आहे. नवरदेवासाठी त्याचे मित्रच लग्नातील विघ्न ठरले आहेत. खरंतर, वधू-वरांनी एकमेकांना पसंत केल्यानंतर दोन्ही कुटुंबीयांच्या सहमतीनं काष्टी याठिकाणी एका आलिशान हॉटेलमध्ये दोघांच्या लग्नाचं आयोजन करण्यात आलं होतं. कोरोना विषाणूच्या आचारसंहितेमुळे साखरपुडा, हळदी आणि लग्न या तिन्ही समारंभाचं एकाच दिवशी आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान शुक्रवारी साखरपुड्याचा शाही कार्यक्रम झाला. हळदी समारंभाचीही तयारी करण्यात येत होती. हेही वाचा-लग्नमंडपात अचानक पोलिसांची एन्ट्री; नवरदेव-नवरीला विचारला एक सवाल आणि मोडलं लग्न दरम्यान, 'वराचे मित्र चांगले नाहीत' असं कारण देत वधूनं चक्क लग्न मोडलं आहे. सुखा दुःखात साथ देणारे मित्र तरुणासाठी विघ्न ठरले आहेत. त्यामुळे नवरदेवाला वधूशिवाय वऱ्हाड्यांना घेऊन रिकाम्या हाती परत जावं लागलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ahmednagar, Marriage

    पुढील बातम्या