Home /News /ahmednagar /

चोरट्यांनी ATM फोडलं, जिलेटीनचा स्फोट घडवून चोरट्यांनी लंपास केले लाखो रुपये

चोरट्यांनी ATM फोडलं, जिलेटीनचा स्फोट घडवून चोरट्यांनी लंपास केले लाखो रुपये

जिलेटीनचा (Gelatin) स्फोट घडवून एटीएम फोडण्यात आलं आहे.

अहमदनगर, 06 डिसेंबर: अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात चोरट्यांनी एटीएम (ATM) फोडल्याची घटना घडली आहे. जिलेटीनचा (Gelatin) स्फोट घडवून एटीएम फोडण्यात आलं आहे. जवळपास तीन लाखांहून अधिक रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात चोरट्यांनी जिलेटीनचा स्फोट करून एटीएम फोडल्याची घटना घडली आहे. समनापूर गावातील बाजारपेठेत असलेल्या इंडिया वन कंपनीच्या ATM वर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. चोरट्यांनी जिलेटीनचा स्फोट करून एटीएम मशिनमधून तीन लाखांच्यावर रक्कम लंपास केली आहे. पहाटे अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे. हेही वाचा- ''Omicron वर आम्ही लक्ष ठेऊन आहोत, पण केंद्रानंही...'', अजित पवार संतापले डॉग स्कॉड आणि फॉरेन्सिक टीमनं आरोपींचा माग काढण्याचा प्रयत्न केला. तर संगमनेर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. जळगावमध्येही ATM फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी जळगावच्या फैजपूर फैजफूर येथे चोरट्यांनी मध्यरात्री एसबीआय (SBI) बँकेचे एटीएम फोडण्याचा (thieves smashed the ATM) प्रयत्न केला. पण त्यांचा तो प्रयत्न अखेर अयशस्वी ठरला. चोरांनी कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा तो प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यामुळे लाखो रुपयांची रक्कम सुरक्षित राहिली. खरंतर आरोपी कटरने एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न करत होते. पण या दरम्यान मशीनमध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे मशीनमधून अचानक धूर यायला लागला. या धुरामुळे चोर घाबरले. त्यांनी तातडीने घटनास्थळावरुन पळ काढला.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Ahmednagar

पुढील बातम्या