काका भारी, पुतण्याही लय भारी, अजितदादांनी रिक्षा तर रोहित पवारांनी चालवला टेम्पो VIDEO

काका भारी, पुतण्याही लय भारी, अजितदादांनी रिक्षा तर रोहित पवारांनी चालवला टेम्पो VIDEO

आज सुद्धा काका आणि पुतण्याच्या वाहनांच्या 'ट्रायल टायमिंग'चा व्हिडीओ समोर आला आहे.

  • Share this:

अहमदनगर, 28 ऑगस्ट : राष्ट्रवादीचे (ncp) नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) आपल्या रोखठोक विधानांमुळे कायम चर्चेत असतात. त्यांचा पुतण्या रोहित पवार (mla rohit pawar) सुद्धा आमदार झाल्यानंतर बऱ्याच वेळा अजितदादांच्या पाऊलावर पाऊल टाकत निर्णय घेण्यास मागे पुढे पाहत नाही. आज सुद्धा काका आणि पुतण्याच्या वाहनांच्या ट्रायल टायमिंगचा व्हिडीओ समोर आला आहे.

कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार मतदारसंघातील युवकांसाठी आणि सर्व नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी कार्यरत आहेत. युवांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, त्यांना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी सहकार्य मिळावे या अनुषंगाने ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजने’अंतर्गत (CMEGP) “माझा व्यवसाय, माझा हक्क” ही योजना कर्जत-जामखेड या मतदारसंघात राबविण्यात येत आहे.

या योजनेच्या लाभार्थ्यांना रोहित पवार यांच्या शुभहस्ते टेम्पोची चावी देऊन गाड्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी रोहित पवार यांनी चक्क टेम्पोची टेस्ट ड्राईव्ह घेतली. रोहित पवारांनी टेम्पो चालवत असल्याचे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

दहीहंडी आणि गणेशोत्सवात निर्बंध लावाच, केंद्राची राज्य सरकारला सुचना

दुसरीकडे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामतीत दौऱ्यावर आहेत. भल्या पहाटेपासून त्यांच्या कामांचा झंझावात सुरू आहे. एका कंपनीच्या कार्यक्रमादरम्यान पियाजिओ कंपनीने तयार केलेल्या इलेक्ट्रिक रिक्षाची  त्यांनी बारकाव्याने पाहणी केली.

यावेळी अजित पवार यांनी चक्क एका रिक्षा स्वत: चालवून उपस्थितींना आश्चर्याचा धक्का दिला. बारामतीच्या पियाजिओ कंपनीने इलेक्ट्रीक रिक्षा तयार केली आहे. आज अजित पवार यांनी पियाजिओ कंपनीला भेटी दिली. या भेटीच्या वेळी अजितदादांनी इलेक्ट्रीक रिक्षाची चक्कर मारली. अजित पवारांच्या या  रिक्षा ट्रायलमुळे उपस्थित सर्वच अवाक झाले.

Published by: sachin Salve
First published: August 28, 2021, 10:36 PM IST

ताज्या बातम्या