अहमदनगर, 23 एप्रिल : राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख (Minister Shankarrao Gadakh) यांचे स्वीय सहाय्यक राहुल राजळे (Rahul Rajale) यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. मंत्र्यांच्या पीएवर गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील घोडेगाव (Ghodegaon Ahmednagar) जवळ ही घटना घडली आहे.
या हल्ल्यात राजळे यांना गोळी लागली आहे. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अहमदनगरच्या मॅक्सकेअर रूग्णालयात राहुल राजळे यांच्यावर उपचार सुरू आहेत.
राजकीय वैमनस्यातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पाच जणांच्या टोळक्याने हल्ला केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. हल्लेखोरांचा पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. मंत्र्याच्या पिएवर गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे.
वाचा : 'इमारती खाली या, महाप्रसाद देतो' आक्रमक शिवसैनिकांनी बॅरिकेडिंग तोडत थेट राणा दाम्पत्याला चॅलेंज
मिळालेल्या माहितीनुसार, शंकरराव गडाख यांचे स्वीय सहाय्यक राहुल राजळे हे शुक्रवारी रात्रीच्या सुमारास आपल्या गाडीने घारकडे निघाले होते. घोडेगाव परिसरात ये येताच त्यांच्यावर अज्ञातांनी बेछूट गोळीबार केला. गोळीबार करत राहुल राजळे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात राहुल राजळे हे जखमी झाले. या हल्ल्यानंतर त्यांना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. राजळे यांच्या पायाला गोळी लागली असल्याची माहिती समोर आली आहे. राजकीय वैमनस्यातून हा हल्ला झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात देवगिरी एक्सप्रेसवर सशस्त्र दरोडा
देवगिरी एक्सप्रेसवर सशस्त्र दरोडा पडल्याची माहिती समोर आली. औरंगाबाद जिल्ह्यातील पोटूळ रेल्वे स्थानकाजवळ गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. औरंगाबादहून मुंबईकडे देवगिरी एक्सप्रेस येत होती. रात्री साधारणत: 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असल्याचं वृत्त समोर येत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, औरंगाबादहून मुंबईच्या दिशेने देवगिरी एक्सप्रेस निघाली होती. 22 एप्रिलच्या रात्री 1 वाजण्याच्या सुमारास दरोडेखोरांनी पोटूळ रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या सिग्नलला कापड बांधून ठेवले होते. त्याच दरम्यान दरोडेखोरांनी एक्सप्रेसवर जोरदार दगडफेक सुद्धा केली. एक्सप्रेस थांबताच 5 नंबरच्या डब्यापासून 9 नंबरच्या डब्यापर्यंत दरोडेखोरांनी दरोडा टाकला असल्याची माहिती मिळाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.