मराठी बातम्या /बातम्या /ahmednagar /

घरातून हाकलून दिले अन् मेसेज करून दिला तलाक, नगरमधील घटना

घरातून हाकलून दिले अन् मेसेज करून दिला तलाक, नगरमधील घटना

विवाहानंतर नोकरीला लावून देण्यासाठी पतीच्या घरच्यांकडून विवाहितेकडे पैशाची मागणी होत होती.

विवाहानंतर नोकरीला लावून देण्यासाठी पतीच्या घरच्यांकडून विवाहितेकडे पैशाची मागणी होत होती.

विवाहानंतर नोकरीला लावून देण्यासाठी पतीच्या घरच्यांकडून विवाहितेकडे पैशाची मागणी होत होती.

अहमदनगर, 3 ऑगस्ट : तीन तलाकातून (triple talaq) सुटका होण्यासाठी कायदा करण्यात आला आहे. पण, अजूनही मुस्लिम समाजात तोंडी तलाक देण्याच्या घटना वारंवार घडत आहे.  हुंड्यासाठी शारीरिक, मानसिक छळ करत विवाहितेला घरातून हाकलून दिले आणि त्यानंतर मोबाईल फोनवर मेसेज (mobile massage) पाठवून तलाक (talaq) देण्याची धक्कादायक घटना अहमदनगर (ahmednagar) जिल्ह्यातील भिंगार येथे घडली. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिंगार येथील महिलेचा तीन वर्षांपूर्वी रायमोह बीड जिल्ह्यातील खालिद ख्वाजा सय्यद याच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर नोकरीला लावून देण्यासाठी पतीच्या घरच्यांकडून विवाहितेकडे पैशाची मागणी होत होती.  पैसे न दिल्याने पतीने विवाहितेस दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

8 महिने हॉटेलमधील सुपर डिलक्स खोलीत केली जीवाची मुंबई; 25 लाखांचं बिल पाहिलं आणि

तसंच उपाशीपोटी ठेवून घरातून हाकलून देणे, सतत मारहाण करणे, मानसिक छळ करणे असा प्रकार दिवसेंदिवस वाढतच गेला. या पीडित महिलेचा हा छळ 1 एप्रिल 2018 पासून ते आजपर्यंत सुरूच होता. अखेर सासू आणि नवऱ्याच्या जाचाला कंटाळून पीडित विवाहित महिला आपल्या माहेरी भिंगार येथे आली.

पत्नी माहेरी गेली हे समजल्यावर पतीने तिला मोबाईलवर तीन वेळेस तलाक असा मेसेज पाठवून तलाक दिला. आपल्या पतीने तलाक दिल्यामुळे विवाहित महिलेला मोठा धक्का बसला.

कोरोनामधून घरी बरे झालेल्या रुग्णांना किडनीचा धोका अधिक: रिसर्च

तिने या प्रकरणी 1 सप्टेंबर 2021 रोजी भिंगार पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, पती खालिद ख्वाजा सय्यद, सासरे ख्वाजा मैमुद्दीन सय्यद, दीर परवेज ख्वाजा सय्यद, सासू परवीन ख्वाजा सय्यद, सासूची आई सुग्राबी जाफर सय्यद (सर्व रा. रायमोह, ता. शिरूर, जि. बीड) यांच्याविरोधात भादंवि ४८८, ३२३, ५०४, ५०६, ३४, तसंच मुस्लिम महिला विवाह संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First published: